इराणी टोळीच्या कुख्यात गुंडाला पोलिसांनी शिताफीने केली अटक, चोरी, चेन स्नॅचिंग आणि चिटींगचे शंभरहून अधिक गुन्हे

पोलीस आल्याची माहिती मिळताच कासिमने घराची कौले काढून बाजूच्या इमारतीच्या टेरेसवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र...

इराणी टोळीच्या कुख्यात गुंडाला पोलिसांनी शिताफीने केली अटक, चोरी, चेन स्नॅचिंग आणि चिटींगचे शंभरहून अधिक गुन्हे
ArrestImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 9:03 PM

मुंबई : महाराष्ट्र आणि शेजारील राज्यात चेन स्नॅचिंग, चोरी आणि चिटींगच्या शंभरहून अधिक केसेस नावावर असलेल्या तसेच पाच प्रोडक्शन वॉरंट आणि चार अजामिनपात्र वॉरंट शिवाय मोक्का कायद्यांतर्गत कारवाई होऊनही पोलिसांना गुंगारा देणाऱ्या इराणी टोळीचा कुख्यात गुंड कासिम मुखतार इराणी उर्फ तल्लफ याला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने धारवाड परिसरातून अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी पिस्तुल, 5 मोटर सायकल असा आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सराईत गुंड कासिम इराणी  हा आंबीवली परिसरातील इराणी वस्तीसह मुंब्रा आणि घाटकोपर अशा इराणी वस्तीत आपला मुक्काम सतत बदलत राहायचा. त्याला पकडण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र तो आपली राहण्याची ठिकाणे वारंवार बदलत असल्याने त्याला पकडण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.

पळून जाण्याचा प्रयत्न

हा आरोपी कर्नाटकमधील धारवाड परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसानी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तो राहत असलेल्या परिसरात पहाटेच्या सुमारास सापळा रचला.  पोलीस आल्याची माहिती मिळताच कासिमने घराची कौले काढून बाजूच्या इमारतीच्या टेरेसवरुन फिल्मीस्टाइलने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चातुर्याने त्याला अटक केली. त्याच्या झडती घेतली असता त्याच्या कडून एक देशी पिस्तुल जप्त केली आहे.

पोलीसांचे कौतूक

आरोपीला कल्याण झोन – 3 चे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घेटे, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी अनिल गायकवाड, मधुकर दाभाडे, अशोक पवार, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, संदिप भोईर यांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या. खडकपाडा पोलीसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.