नोकरीच्या पहिल्याच दिवशी सामूहिक बलात्कार करुन नर्सची हत्या? उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना
नव्यानं सुरु झालेल्या एका मेडिकल फॅसिटिलीच्या रुपमध्ये लोखंडी रॉडवर नाझियाचा मृतदेह रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला.
उत्तर प्रदेशातील एका नर्सचा मृतदेह (Nurse Dead body) धक्कादायक अवस्थेत आढळून आलाय. या नर्सच्या नोकरीचा पहिलाच दिवस (1st Day of Job) होता. या दिवशीच नर्ससोबत गैरकृत्य झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्याचप्रमाण या नर्सच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. याप्रकरणी सामूहिक बलात्कार (Gang Rape and Murder) करुन हत्या करण्यात आल्याचा गुन्हाही पोलिसांनी दाखल करुन घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये ही खळबळजनक घटना घडली. हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरीला लागल्याच्या पहिल्याच दिवशी नेमकं या नर्सबरोबर काय झालं? याबाबतचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय. एका खासगी रुग्णालाय ही तरुणी नर्स म्हणून ज्या दिवशी रुजू झाली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी या तरुणीचा मृदहेद हॉस्पिटलमधूल एका लोखंडी सळलीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यावेळी तरुणीचं तोंड कपडा टाकून झाकण्यात आलं होतं.
धक्कादायक
उन्नावच्या धुलापुरवा गावात एक खासगी रुग्णालय आहे. न्यू जीवर हॉस्पिटल असं या रुग्णालयाचं नाव आहे. या रुग्णालयात शुक्रवारी 19 वर्षांची नाझिया ही तरुणी नर्स म्हणून नुकतीत नोकरीवर रुजू झाली होती. टिकाना गावातील नाझियाचा शुक्रवारी नोकरीचा पहिलाच दिवस होता. दरम्यान, शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये थेट तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली.
धास्तावणारा प्रसंग
नव्यानं सुरु झालेल्या एका मेडिकल फॅसिटिलीच्या रुपमध्ये लोखंडी रॉडवर नाझियाचा मृतदेह रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला. त्यावेळी तिच्या तोंडावर एक कपडा टाकण्यात आला होता. तिच्या हातरुमाला सारखा कपडा तिच्या छातीत आणि भिंतीत कोंबण्यात आला होता.
सामूहिक बलात्कारानंतर हत्या?
नाझियाचा मृतदेह पाहून धास्तावलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पुढे पाठवलाय. दरम्यान, मृत नाझियाचा कुटुंबीयांनी नाझियाचा सामूहिक बलात्कार झाला असून यानंतर तिची हत्या करण्यात आली असल्याची तक्रार केली आहे.
तिच्या आईन केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करुन घेतलाय. 25 एप्रिललचा या रुग्णालयाच उत्तर प्रदेशचे आमदार श्रीकांत कटीयार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासांनी समोर आलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आता नाझियाचा मृत्यूचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.