पाणीपुरी खाल्ल्यानंतर झाला नर्सिंगच्या विद्यार्थीनीचा मृत्यू ? काय नेमके घडले पाहा
नर्सिंग हॉस्टेसमध्ये परतल्यानंतर तिने डॉक्टरांनी दिलेले औषध घेतले. 5 जुलैला तिला ताप आला. पुन्हा ती ओपीडीमध्ये गेली. डॉक्टरांनी तिला वॉर्ड क्रमांक 48 मध्ये भरती केले.
नागपूर : नर्सिंगचे शिक्षण घेण्यास आलेल्या एका विद्यार्थीचा पाणीपुरी खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आले आहे. जम्मू सारख्या राज्यातून आपल्या करीयरसाठी नागपूरात शिक्षण घेणाऱ्या 18 वर्षीय तरूणीचा असा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
शीतल कुमार जम्मूच्या कठुआ जिल्ह्याची रहीवासी असून गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून ती नर्सिंगच्या प्रशिक्षणासाठी एका मेडीकल विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये रहात होती. तीन जुलैच्या रात्री शीतलला उलटी झाली. दुसऱ्या दिवशी आजारी पडली. तिच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्याने तिला सकाळी ओपीडीत डॉक्टरांना दाखविण्यात आले. डॉक्टरांनी तिला दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला दिला. परंतू तिने दवाखान्यात भरती होण्यास नकार दिला.
नर्सिंग हॉस्टेसमध्ये परतल्यानंतर तिने डॉक्टरांनी दिलेले औषध घेतले. 5 जुलैला तिला ताप आला. पुन्हा ती ओपीडीमध्ये गेली. डॉक्टरांनी तिला वॉर्ड क्रमांक 48 मध्ये भरती केले. तिला गॅस्ट्रोसारखी लक्षणे दिसत होती. नंतर शीतलची तब्येत बिघडल्याने आयसीयूत दाखल केले. परंतू रात्री तिचा मृत्यू झाला.
या मागे पाणीपुरी खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला का असा सवाल केला जात आहे. कॉलेजच्या प्रिन्सिपलनी सांगितले की पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिची तब्येत बिघडली. शीतलची अवस्था पाहिल्यानंतर तिची मैत्रिणीलाही कसे तरी व्हायला लागले. शीतलची लक्षणे तिच्यात दिसु लागल्याने तिलाही आयसीयूत भरती करण्यात आले आहे. तिची प्रकृती आता स्थिर आहे. तिने शीतल सोबत पाणीपुरी खाल्ली होती.
पोस्टमार्टेमनंतर होणार खुलासा
मृत्यूच्या एक दिवस आधी शीतलने आपल्या लघवीतून रक्त आल्याचे तिच्या मैत्रिणीला सांगितले होते. शीतलची मैत्रीणीच्या लघवीतूनही रक्त आले होते. शीतलचा मृत्यू गॅस्ट्रोने झाला की अन्य कोणत्या कारणाने अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर काय तो खुलासा होऊ शकेल अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.