तुमच्याकडे जनावरे असेल तर अशी चुक करू नका? नाहीतर तुमच्यावर पोलीस कारवाई करणार? कारण आहे तरी काय?

मोकाट जनावरांनी अनेकदा रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तींना धक्का दिला, अनेक वाहनांचा मोकाट जनावरांमुळे अपघात झाला, अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

तुमच्याकडे जनावरे असेल तर अशी चुक करू नका? नाहीतर तुमच्यावर पोलीस कारवाई करणार? कारण आहे तरी काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 1:56 PM

नाशिक : तुमच्याकडे जनावरे आहेत आणि ती जर तुम्ही मोकाट सोडून (animals  ) देत असाल आणि त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल तर तुमच्यावर कारवाई ( Police Action ) होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे नुकताच नाशिक पोलिस ( Nashik Police ) आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीवरून जनावर मालकांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने नाशिक शहरात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाणे मध्ये राजेंद्र कंदारी त्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून जनावर मालक उत्तम भालेराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

खरंतर मोकाट जनावरे हा प्रश्न एखाद्या अपघातानंतर निर्माण होत असतो. त्या वेळेला महापालिकेच्या माध्यमातून मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागावा अशा पद्धतीची मागणी देखील अनेकदा केली जाते, लोकप्रतिनिधी यासाठी आग्रही असतात.

मोकाट जनावरांनी अनेकदा रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तींना धडक दिली आहे. अनेक वाहनांचा मोकाट जनावरांमुळे अपघात झाला आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्याने रहदारी झाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हे सुद्धा वाचा

याशिवाय भररस्त्यात मोकाट जनावरे आपापसात भिडल्याचे चित्र पाहायला मिळत असते. त्यामुळे मोकाट जनावरांचा फटका अनेकांना बसलेला आहे. अनेक ठिकाणी रहदारीचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे.

नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेंद्र कनगारे‎ हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गस्तीवर होते. त्यांना दोन गायी आणि एक गोऱ्हा रस्त्यावर आढळून आला. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना त्याची भीती जाणवत होती.

याच पार्श्वभूमीवर देवळाली पोलिसांनी मोकाट जनावरांचा वाहतुकीला अडथळा म्हणून जनावर मालक यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जुनी स्टेशनवाडी परिसरात राहणाऱ्या उत्तम भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर खरंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिक शहरातील असा पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे. देवळाली पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा बघता परिसरात मोकाट जनावरे सोडून देणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

नाशिक शहरातील विविध भागात मोकाट जनावरे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे अनेकांना धडक दिल्याने नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहे. याशिवाय वाहतुकीला अडथळा झाल्याचेही अनेकदा समोर आले आहे.

त्यामुळे या जनावर मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी येत्या काळात काय कारवाई करतात ही पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. पण दुसऱ्या बाजूला आता मोकाट जनावरे सोडून देणारे पुढील काळात काय काळजी घेतात हा देखील महत्वाचा मुद्दा आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.