वैवाहिक संकट दूर करण्यासाठी सासरच्यांनी विवाहितेला मांत्रिकाकडे सोडलं, 79 दिवस बलात्कार

28 एप्रिल रोजी महिलेला मांत्रिकाचा मोबाईल सापडला. यानंतर महिलेने तिच्या आई-वडिलांना फोन करुन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. याची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेची मांत्रिकाच्या ताब्यातून सुटका केली

वैवाहिक संकट दूर करण्यासाठी सासरच्यांनी विवाहितेला मांत्रिकाकडे सोडलं, 79 दिवस बलात्कार
महिलेवर बलात्कारImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 8:12 AM

भुवनेश्वर : ओदिशातील बालासोरमध्ये (Odisha Crime News) एका महिलेने तिचा पती आणि सासरच्या मंडळींवर मांत्रिकासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, मांत्रिकाने बालासोर जिल्ह्यातील जलेश्वर भागात वैवाहिक वाद मिटवण्याच्या बहाण्याने 79 दिवस तिच्यावर बलात्कार (Rape) केला. मांत्रिकासह पीडित महिलेने जलेश्वर पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्यांविरोधातही तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

महिलेने 2017 मध्ये लग्न झाल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. याबाबत तिने पतीला सांगितले असता त्यानेही महिलेवर आरोप केले.

वैवाहिक संकट दूर करण्यासाठी मांत्रिकाकडे सोडलं

काही दिवसांनी तिचा नवरा कामानिमित्त बाहेर गेला. यानंतर महिलेची सासू गीता राणी तिला मांत्रिकाकडे घेऊन गेली. सासूने महिलेला सांगितले की मांत्रिक त्यांचा कौटुंबिक वाद संपवेल, परंतु यासाठी तिला काही दिवस त्याच्यासोबत राहावे लागेल. महिलेच्या विरोधाला न जुमानता सासरच्यांनी तिला तिथेच सोडल्याचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा

मांत्रिकाच्या ताब्यातून सुटका

28 एप्रिल रोजी महिलेला मांत्रिकाचा मोबाईल सापडला. यानंतर महिलेने तिच्या आई-वडिलांना फोन करुन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. याची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेची मांत्रिकाच्या ताब्यातून सुटका केली. या प्रकरणी महिलेने पती नीलमणी जेना, सासरा पूर्णचंद्र, सासू गीता राणी आणि सूर्यमणी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

इंडिया टुडेशी बोलताना बालासोरचे एसपी सुधांशू मिश्रा म्हणाले की, जलेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. एसके तरफ असे या मांत्रिकाचे नाव असून तो बालासोरच्या भोगराई ब्लॉकमधील काखरा गावचा रहिवासी आहे. तो मयूरभंज जिल्ह्यातील बांचदिहा गावात राहतो. मांत्रिकाने 79 दिवस तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तिला एका खोलीत कोंडून ठेवले होते.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.