रात्री सर्वजण गाढ झोपेत होते, अचानक किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या, शेजाऱ्यांनी येऊन पाहिले तर…

संपत्तीचा वाद टोकाला गेला. संपत्तीसाठी रक्ताच्या नात्याचाही विसर पडला. मग सख्या भावाने जे केले ते पाहून नात्यावर विश्वास बसणार नाही.

रात्री सर्वजण गाढ झोपेत होते, अचानक किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या, शेजाऱ्यांनी येऊन पाहिले तर...
Image Credit source: shutterstock
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 9:04 AM

बरगढ : संपत्तीसाठी कोण कोणत्या थराला जाईल, हे सांगू शकत नाही. पैसा आणि संपत्तीमुळे रक्ताच्या नात्याचाही लोकांना विसर पडतो. अशीच एक ओडिसात उघडकीस आली आहे. संपत्तीच्या वादातून भावानेच भावासह त्याच्या कुटुंबाची हत्या केल्याची घटना घडली आहे. बरगढ जिल्ह्यातील झिकीझिकी गावात ही खळबळजनक घटना घडली. हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सूत्र हलवत आरोपीला अटक केली आहे.

लहान भावाने मोठ्या भावाच्या कुटुंबाची हत्या केली

भावा-भावांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु होता. याच वादातून सोमवारी रात्री लहान भाऊ मोठ्या भावाच्या घरी घुसला. यानंतर त्याने भाऊ आणि वहिनीसह त्यांच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केली. मात्र यावेळी ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांना येताना पाहून आरोपी फरार झाला. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला.

आरोपी अटक

पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवत पळून चाललेल्या आरोपीला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संपत्तीच्या वादातून आपण हे कृत्य केल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत, पुढील तपास सुरु केला आहे.

हे सुद्धा वाचा

यूपीमध्ये जमिनीच्या वादातून पित्याची हत्या

जमिन नावावर करुन देत नव्हते उत्तर प्रदेशात मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या हत्येनंतर आरोपी मुलगा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.