Crime : दोन जिगरी फिरायला गेले, मस्त मजा केली अन् झोपल्यावर… दोस्तानेच प्रायव्हेट पार्टसोबत नको ते केलं!
आपण ज्या मित्राशिवाय राहूशी शकत नसतो. पण जर याच मित्राने आपला घात केला तर. तुमचा मैत्रीवरचा विश्वास नक्कीच उडेल ना. तर अशीच एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
Crime News : प्रत्येकासाठी मैत्री खूप महत्त्वाची असते आणि सर्वांना त्यांचा एक जवळचा मित्र किंवा मैत्रीण असते. आपल्या या जवळच्या मित्रांसोबत आपण प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो, त्याच्यासोबत फिरत असतो, त्याच्यासोबत प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असतो. आपण त्या मित्राशिवाय राहूशी शकत नसतो. पण जर याच मित्राने आपला घात केला तर. तुमचा मैत्रीवरचा विश्वास नक्कीच उडेल ना. तर अशीच एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्य़ातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने आपल्या बेस्ट फ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. हे कृत्य केल्यानंतर त्या तरूणाने आपल्या रक्तबंबाळ झालेल्या मित्राला तेथेच सोडून पळून गेला. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार राजनगर येथे घडला आहे. या घटनेनंतर गंभीररित्या जखमी झालेल्या युवकाला एससीबी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
भागवत दास आणि त्याचा मित्र अक्षय रविवारी सुट्टीच्या दिवशी फिरायला गेले होते. ते दोघे पेंठा येथे असलेल्या समुद्र किनारी गेले होते. अक्षयने भागवतला फिरायला जाण्यासाठी विचारलं होते. त्यानंतर ते दोघे बीचवर गेले होते.
दोघांनी समुद्र किनारी भरपूर वेळ घालवला. त्यानंतर दोघांनी जेवण केलं आणि ते तिथेच झोपले. जेव्हा भागवत झोपला तेव्हा अक्षयने धारदार शस्त्राने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यानंतर भागवत गंभीर जखमी झाला आणि त्यावेळी मात्र अक्षय तेथून फरार झाला.
जखमी भागवतने त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर त्याचे नातेवाईक ताबडतोब घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना भागवत बेशुद्ध अवस्थेत आढळला. तसंच त्यावेळी त्याच्या शरीरातून रक्त प्रवाह होत होता. नातेवाईकांनी त्याला रूग्णालयात दाखल केलं.
दरम्यान, भागवतच्या काकांनी अक्षय विरूद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलीस अक्षयचा शोध घेत आहेत. मात्र, अक्षयने हे कृत्य का केलं याबाबत अद्यापही समजलेलं नाहीये.