ना हकरत दाखल्यासाठी सव्वा लाखाची लाच मागितली, अग्नीशमन अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले !

| Updated on: Jun 28, 2023 | 10:36 AM

ना हरकत देण्यासाठी लाच मागणाऱ्या अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्याची तुरुंगात रवानगी झाली आहे. या कारवाईमुळे अग्नीशमन दलात एकच खळबळ उडाली आहे.

ना हकरत दाखल्यासाठी सव्वा लाखाची लाच मागितली, अग्नीशमन अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले !
सांगलीत सवा लाखाची लाच घेताना अग्नीशमन अधिकाऱ्यास अटक
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली : ना हरकत प्रमाणपत्रासाठी लाच घेणे एका अग्नीशमन अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. सव्वा लाखाची लाच घेताना प्रभारी अग्नीशमन अधिकाऱ्यास सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विजय आनंदराव पवार असे लाच घेणाऱ्या अग्नीशमन अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ माजली आहे.

ना हरकत दाखला देण्यासाठी मागितली लाच

फिर्यादी यांनी अग्नीशमन विभागाकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. हा दाखला देण्यासाठी मिरज आणि कुपवाड महापालिकेचा प्रभारी अग्नीशमन अधिकारी विजय पवार याने सव्वा लाखाची लाच मागितली होती. फिर्यादीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. मंगळवारी संध्याकाळी रंगेहाथ ठरल्या ठिकाणी फिर्यादी आि आरोपी लाचेची रक्कम देण्यासाठी भेटले. यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाचे पथक आधीच सापळा लावून बसले होते.

फिर्यादीने दिलेली रक्कम स्वीकारत असतानाच लाटलुचपत विभागाच्या पथकाने अग्नीशमन अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. आरोपीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. या कारवाईमुळे अग्मीशमन दलात एकच खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा