वृद्ध झोपलेल्या झोपडीला लागली आग, नंतर घडलं हे विपरीत…

या झोपडीत एका इसमाचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही आगीची घटना कशी घडली याबाबत मात्र अधिक महिती मिळू शकली नाही.

वृद्ध झोपलेल्या झोपडीला लागली आग, नंतर घडलं हे विपरीत...
नवी मुंबईत झोपडीला आगImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 4:25 PM

नवी मुंबई : गेल्या काही दिवसात नवी मुंबईतील आगीच्या (Fire) घटनेत वाढ झाली आहे. काल नवी मुंबईत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. काल दुपारी करंजाडे कॉलेज फाटा येथील सेक्टर 2 ए मध्ये एका झोपडीला अचानक आग लाग्याने खळबळ उडाली. एक्सिस बँकेच्या (Axis Bank) मागील बाजूस ही भीषण घटना घडली आहे. संपूर्ण परिवार हादरून गेला आहे. कारण या झोपडीत एका इसमाचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही आगीची घटना कशी घडली याबाबत मात्र अधिक महिती मिळू शकली नाही. ही घटना कशी घडली याचा शोध सध्या पोलीस प्रशासन (Navi Mumbai Police) घेत आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

आगीत होरपळून वृद्धाचा मृत्यू

या आगीत मृत्यू झालेल्या वक्तीचे नाव सादिक विदिक शेख आहे. ते या झोपडीत झोपले असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे. 65 वर्षीय वय असलेले शेख या आगीतून बाहेर पडण्यात अयशस्वी ठरले. शिवाय वेळीच कोणतीही मदत न मिल्याने त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. त्यांना योग्य वेळी मदत मिळाली असती तर ही घटन टाळता आली असती. आगीच्या अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. त्यात अनेक ठिकाणी जीवीतहानीही झाल्याचे समोर आले आहे. मात्र कालच्या घटनेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने ही घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मदत पोहोचायला उशीर

या भीषण आगीने एका व्यक्तीचा जीव तर घेतलाच आहे. मात्र या आगीत सामानाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र नुकसानीचा एकूण अचूक आकडा अद्याप समजू शकलेला नाहीये. या आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे बंब व पनवेल शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होवून त्यांनी आग आटोक्यात आणली आहे. मात्र तोपर्यंत उशीर झाला होती. मदत पोहोचेपर्यंत ही आग एका व्यक्तीचाजीव घेऊन झाली होती. भविष्यातला धोका ओळखून अशा घटना टाळणे गरजेचे आाहे.

Pimpri-chinchwad crime| पिंपरीत खासगी सावकाराचा प्रताप 60 टक्के व्याजदराने आकार होता व्याज

मोठी बातमी : वकिलानं अंगावर पेट्रोल ओतलं, नांदेड कोर्टाच्या आवारात अनर्थ टळला, काय घडला प्रकार?

त्याच्या मनात काय होतं, कुणालाच थांग नाही, आठवीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या, औरंगाबादमध्ये खळबळ!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.