नाशिकमध्ये बैलगाडा शर्यतीला गालबोट, शर्यत पहायला आले होते वृद्ध, पण…

बैलगाडा शर्यत पहायला जाणे एका वृद्धाच्या जीवावर बेतले आहे. शर्यत सुरु असताना धक्कादायक घटना घडली आणि होत्याचं नव्हतं झालं.

नाशिकमध्ये बैलगाडा शर्यतीला गालबोट, शर्यत पहायला आले होते वृद्ध, पण...
बैलगाडा अंगावर गेलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 10:59 AM

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या वृद्ध व्यक्तीच्या अंगावरुन बैलगाडा गेल्याची घटना नाशिकमध्ये घडली. या घटनेत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. श्रावण जगन्नाथ सोनवणे असे या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बैलगाडा शर्यतीत ही दुर्दैवी घटना घडल्याने शर्यतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. सोनावणे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

काय आहे घटना?

गेल्या आठवड्यात 6 जून रोजी नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील बोरगड येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आलेल्या एका 64 वर्षीय वृद्धाच्या अंगावरून बैलगाडा गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रावण सोनवणे हे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आले होते. यावेळी बैलगाडा शर्यतीतील बैल उधळल्याने सोनवणे यांच्या अंगावरून बैलगाडी गेली होती. त्यात त्यांच्या छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सोनवणे यांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.