दसऱ्या दिवशी अंबानी कुटुंबियांना धमकीचा फोन आल्याने खळबळ
अनोखळी नंबर वरुन हा धमकीचा फोन आला आहे. दसऱ्या दिवशी हा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि कुटुंबियांना पुन्हा एकदा धमकी आली आहे. रिलायन्स कुंटुंबाशी संबधित रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या हॉस्पीटल उडवून देण्याची धमकी आली आहे. अनोखळी नंबर वरुन हा धमकीचा फोन आला आहे. दसऱ्या दिवशी हा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.
यापूर्वी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी देखील अंबानी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलच्या (Reliance Hospital) लॅन्डलाईनवर फोन करुन ही धमकी देण्यात आली होती.
येत्या तीन तासात अंबानी कुटुंबियांना संपवणार असल्याची धमकी यावेळी फोनवर देण्यात आली होती. यांनतर पोलिसांनी तात्काळ तपास करत धमकी देणाऱ्याचा छडा लावला. धमकी देणारा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले.
यानंतर पुन्हा एकदा अंबानी कुटुंबियांना धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी थेट अंबानी कुटुंबियांना नाही तर, त्याच्याशी संबधीत रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी आली आहे.
या धमकीच्या फोन नंतर पोलिस यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. डी. बी मार्ग पोलीस ठाण्यात (D. B Marg Police Station) याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेत आहेत.