बरेली | 7 ऑगस्ट 2023 : लग्न म्हटलं की आनंदाचं, लगबगीचं वातावरणं असतं. पण बरेलीमध्ये लग्नाचा (marriage day) हाच दिवस एका वधूसाठी काळा दिवस ठरला. त्याची आठवणही तिला नकोशी झाली होती. तिचं लग्न ठरलं होतं पण ते झालंच नाही, आणि त्याला कारणीभूत ठरली वराची (groom absconded) एक चूक… त्याच्या एका कृतीमुळे आनंदाचे वातावरण क्षणार्धात काळोखून गेले.
बरेलीतील नवाबगंज ठाणे क्षेत्रात एका तरूणीचा निकाह होता. ती मेहंदी लावून, छान सजून, तिच्या होणाऱ्या नवऱ्याची वाट बघत होती. मात्र तेवढ्यात सर्वांच्याच कानावर एक धक्कादायक बातमी आली. नवरा मुलगा हा लग्नमंडपातून पळाला. एवढचं नव्हे तर तो त्याच्याच मावस बहिणीसोबत पळून गेल्याची ही धक्कादायक बातमी ऐकून सर्वच हैराण झाले. वधूकडची मंडळी तर मटकन खालीच बसली.अखरे त्यांनी वरपक्ष आणि नवऱ्यामुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
नक्की काय झालं ?
बरेली येथे वधूच्या वेशातील तरूणीने हातावर सुरेख मेहंदी काढली होती. बाहेर लग्नाचे, आनंदाचे वातावरण होते, सर्वजण आनंदाने नाच-गात होते. पण त्यांच्या आनंदाला क्षणात गालबोट लागले. नवरा मुलगा भर मंडपातूनच फरार झाल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. लग्न लागण्यापूर्वीच तो त्याच्या मावल बहिणीसोबत पळून गेला.
कुटुंबियांना हे कळताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. हैराण करणारी गोष्ट म्हणजे वर आणि वधू यांचा प्रेमविवाह होता. पण त्याचसोबत वराचे दुसऱ्या मुलीशीही, त्याच्य़ा मावस बहिणीशीही प्रेमसंबंध होते.त्यामुळे तो भर मंडपात वधूला एकटं सोडून पळून गेला.
हे संपूर्ण प्रकरण नवाबगंज जवळील आहे. तेथे राहणाऱ्या तरूणाचे त्याच्या प्रेयसीशी लग्न ठरले. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने हा विवाह पार पडणार होता. मात्र निकाहाच्या दिवशीच अचानक हे धक्कादायक सत्य समोर आले की, नवरा मुलगा त्याच्या मावस बहिणीसोबत पळू गेला. हैराण करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ज्यांचं लग्न ठरलं होतं, त्या वर-वधूचाही प्रेमविवाह होता. आधी त्यांचे कुटुंबिय या विवाहासाठी तयार नव्हते, पण त्या दोघांनी खूप प्रयत्न करून घरच्यांना लग्नासाठी राजी केले. मुलांच्या आनंदासाठी घरचेही तयार झाले.
लग्नाची तारीख ठरवण्यात आली. रविवारी निकाह होणार होता, सर्व तयारी पण झाली. नवरा मुलगा निकासाहासाठी वरात घेऊन आला. पण ऐन समारंभात तो मध्येच गायब झाला. त्याचा खूप शोध घेण्यात आला. तेव्हाच लक्षात आले की त्याची मावस बहीणीही गायब झाली आहे. आणि थोड्या वेळाने ही बातमी समोर आली की नवरा मुलगा, त्याच्या होणाऱ्या वधूला मंडपात तसाच सोडून बहिणीसह पळून गेला आहे.
वधूलाही अफेअरची माहिती नव्हती
राचे वधू आणि मावस बहीण या दोघींसोबतही अफेअर होते, असे सांगितले जाते. पण वधू आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना याची काहीच माहिती नव्हती. तो नवरा मुलगा आणि बहीण कुठे गायब झाले, याचा शोध लागलेला नाही. दोघांचा ठावठिकाणा अद्यापही समजू शकलेला नाही.
पोलिसांत नोंदवली तक्रार
नवऱ्या मुलाच्या या कृत्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला असून वधूच्या कुटुंबियांनी वर आणि वर पक्षाविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलिस सध्या फरार वर आणि त्याच्या बहिणीचा कसून शोध घेत आहेत.