Mumbai Crime : डॉक्टर -डॉक्टर खेळू असे सांगत घरात घेऊन गेली अन्… ‘त्या’ प्रसंगाने सर्वच हादरले !

शहरातील वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढलेली असताना आता त्यामध्ये अल्पवयीन आरोपींचाही सहभाग वाढल्याचे समोर आले आहे. खेळण्याच्या बहाण्याने मैत्रिणीला घरी बोलावून तिची फसवणूक करणाऱ्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Mumbai Crime : डॉक्टर -डॉक्टर खेळू असे सांगत घरात घेऊन गेली अन्... 'त्या' प्रसंगाने सर्वच हादरले !
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 8:26 AM

विरार | 15 सप्टेंबर 2023 : लहान मुलं ही निष्पाप, निरागस असतात. पण आजच्या काळात काही मुलं साधीभोळी उरलेली नाहीत. गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांचा त्यांच्यावरही परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचं कोवळ मन हरवलं आहे आणि ती अकालीच प्रौढ होत आहेत. मुंबईतील उपनगरामध्ये एक धक्कादायक घटना (crime news) उघडकीस आली आहे. तेथे अवघ्या १५ वर्षांच्या मुलीने एक अल्पवयीन मुलीला फसवल्याचे समोर आले आहे. त्या मुलीच्या मदतीने एका १७ वर्षांच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार (physically abused) केल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एवढ्या लहान, खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलं कोणत्या थराला जाऊन पोहोचली आहेत, हे पाहून सर्वच हादरले.

विरार येथे हा अतिशय दुर्दैवी आणि खळबळजनक प्रकार घडला आहे. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली असून दोन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता लहान मुलेही सुरक्षित नाहीत का, मित्र-मैत्रिणींवरही विश्वास ठेवायचा नाही का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

डॉक्टर-डॉक्टर खेळण्याच्या बहाण्याने खोलीत केले बंद

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक असलेल्या या 15 वर्षाच्या मुलीने 12 वर्षांच्या पीडित मुलीला तिच्या घरी बोलावले. आपण आज डॉक्टर-डॉक्टर खेळू असे सांगत तिने पीडितेला तिच्या बेडरूममध्ये नेले आणि बेडवर झोपण्यास सांगितले. मात्र त्यानंतर ती तिथेच थांबली नाही, तर तिने 17 वर्षाच्या आरोपीला बेडरूममध्ये बोलावले आणि दार बाहेरून घट्ट लावत ती निघून गेली. हे पाहून पीडित मुलगी घाबरली , मदतीसाठी त्या मुलीला बोलावू लागली पण तिचं मन काही द्रवलं नाही. अखेर त्या आरोपी मुलाने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

एवढंच नव्हे तर घडलेल्या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केली किंवा कोणालाही सांगण्याचा प्रयत्न केला, तर तुझ्या लहान बहिणीसोबतही असाच प्रकार घडेल, अशी धमकीही त्या मुलीला आरोपींनी दिली. त्यामुळे घाबरून पीडितेने तिचं तोंड उघडलं नाही. मात्र काही दिवसांनी ती गरोदर राहिली आणि तिच्या आईला सर्व प्रकार कळला. अखेर पीडितेने तिच्या आईला संपूर्ण प्रकार कथन करत आपबिती सांगितली. पीडितेच्या आईने लगेचच पोलिसांत धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 376, 376 (3), 506 पोस्को कायदा कलम 4, 8, 12, 17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.