कल्याण स्टेशन परिसरात फुलांच्या दुकानाला आग, एकाचा होरपळून मृत्यू

कल्याणमध्ये पहाटेच्या सुमारास आगीची घटना घडली आहे. स्टेशन परिसरातील एका फुलांच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत होत्याचं नव्हतं झालं.

कल्याण स्टेशन परिसरात फुलांच्या दुकानाला आग, एकाचा होरपळून मृत्यू
कल्याणमध्ये फुलांच्या दुकानाला आगImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 11:46 AM

कल्याण / सुनील जाधव : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका फुलांच्या दुकानाला आग लागल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण आहे. आग नेमकी कशी लागली याबाबत तपास सुरु आहे. तपासाअंती आगीचे कारण स्पष्ट होईल.

पहाटेच्या सुमारास लागली आग

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या एका फुलाच्या दुकानाला आग लागल्याची घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. दुकानाचे शटर बंद करून एक कामगार दुकानात झोपला होता. शटर बंद असल्याने कामगाराला दुकानाच्या बाहेर निघता आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला. रात्री काम आटपून तो दुकानाचे शटर बंद करून तो दुकानात झोपला होता.

दरम्यान घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मयत इसमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीत दुकानही जळून खाक झाले आहे.

हे सुद्धा वाचा

कॉम्प्युटर्सच्या दुकानाला लागलेल्या आगीत लाखोचे साहित्य जळाले

जळगावच्या पाचोरा शहरातील एका संगणक साहित्य खरेदी-विक्रीच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.