कल्याण / सुनील जाधव : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका फुलांच्या दुकानाला आग लागल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण आहे. आग नेमकी कशी लागली याबाबत तपास सुरु आहे. तपासाअंती आगीचे कारण स्पष्ट होईल.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या एका फुलाच्या दुकानाला आग लागल्याची घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. दुकानाचे शटर बंद करून एक कामगार दुकानात झोपला होता. शटर बंद असल्याने कामगाराला दुकानाच्या बाहेर निघता आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला. रात्री काम आटपून तो दुकानाचे शटर बंद करून तो दुकानात झोपला होता.
दरम्यान घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मयत इसमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीत दुकानही जळून खाक झाले आहे.