ओव्हरटेक करण्याच्या नादात तीन वाहने एकमेकांवर धडकली; अपघातात एक ठार, 10 जखमी

स्कॉर्पिओ, एर्टीगा आणि इंडिका या तीन वाहनांमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात कवठेमहांकाळ येथील एक ठार झाले आहेत. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ओव्हरटेक करण्याच्या नादात तीन वाहने एकमेकांवर धडकली; अपघातात एक ठार, 10 जखमी
कार अपघातात तरुणाचा जळून मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 7:49 PM

सांगली / शंकर देवकुळे : ओव्हरटेक करण्याच्या नादात तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने एकाच जागीच मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या आष्टा येथे घडली. या अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बागणी रोडवरील शिंदेमळा येथे हा अपघात घडला आहे. स्कॉर्पिओ, एर्टीगा आणि इंडिका या तीन वाहनांमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात कवठेमहांकाळ येथील एक ठार झाले आहेत. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक

जखमी पलूस तालुक्यातील नागठाणे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी आष्टा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत.

सोलापुरमध्ये दुचाकी कंटेनरखाली घुसली

राँग साईडने गाडी वळवत असताना भरधाव वेगात आलेली दुचाकी कंटेनरखाली घुसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोलापूर-अक्कलकोट रोडवर हा अपघात झाला. विनीत पोरंटला असे मयताचे, तर पवन नामपल्ली असे जखमीचे नाव आहे. सदर तरुण अक्कलकोटहून सोलापुरकडे जात असताना हा अपघात घडला.

हे सुद्धा वाचा

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इनोव्हा कारचा अपघात

पुणे सातारा महामार्गावरील वरवे गावच्या हद्दीत, चालकाचे इनोव्हा कारवरच नियंत्रण सुटल्यानं कार चारित पडून अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचं यात नुकसानं झालं आहे. कार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.