Amaravati Accident : अमरावतीत तीन वाहनांचा विचित्र अपघातात, घटनेत 1 ठार तर 19 जखमी; पाच जणांची प्रकृती चिंताजनक

सदर अपघातात जखमी व गंभीर असलेल्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये लहान बालकांचा सुद्धा समावेश आहे. या अपघातातील जखमींपैकी 5 ते 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Amaravati Accident : अमरावतीत तीन वाहनांचा विचित्र अपघातात, घटनेत 1 ठार तर 19 जखमी; पाच जणांची प्रकृती चिंताजनक
अमरावतीत तीन वाहनांचा विचित्र अपघातात, घटनेत 1 ठार तर 19 जखमीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 10:49 PM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव ते अकोट महामार्गावर आज तीन वाहनांच्या विचित्र अपघाता (Accident)त एक इसम जागीच ठार (Death) झाला असून, 19 प्रवासी गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. विशाल रामदास पवार (35, रा. माळीपुरा अंजनगाव सूर्जी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर अपघातात जखमी व गंभीर असलेल्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये लहान बालकांचा सुद्धा समावेश आहे. या अपघातातील जखमींपैकी 5 ते 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना अमरावती जिल्हा रुग्णालय, ऊपजिल्हा रुग्णालय परतवाडा, अकोला येथे हलवण्यात आले आहे. प्रवाशी मिळविण्याच्या स्पर्धेत सदर अपघात झाल्याची चर्चा नागरिंकामध्ये होती.

अपघातातील जखमींची नावे

शेख आसीफ शेख आदिल (20, रा. अंजनगाव) आसम शहा मिराकीसन शहा (60, रा. अकोला) सुखाबाई रामचंद्र राऊत (50, रा. अंजनगाव) गुलाब मेश्राम (50, रा. करोडा मध्य प्रदेश) सुफीयन शहा (8, रा. अकोला) आशिया बी शफाकत शहा (40, रा. दर्यापूर) अरमान शरफकन (15, रा. अकोला) अनुसया शंकर भावे (65, रा. अंजनगाव) मो. अफजद मो मुस्ताक (50, रा. अकोट) रहिमा बी कासम शहा (50, रा. अकोला) मुदरसींग शहा समयत शहा (15, रा. अकोला) आसमा परविन मजवर शहा (29, रा. अकोला) फतीमा बी मो अफजद (40, रा. अकोट) अलिया बी शफाकन शहा (13, रा. अकोला) सुशीला वासुदेव शिनकर (65, रा. अंजनगाव) मायरा फिरदोस (6, रा. अकोला) श्रीहरी राऊत (31, रा. हिवरखेड) ओम निलेश निमकाळे (15, रा. भंडारज अजनगाव)

आज बाजाराचा दिवस असल्यामुळे अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती. ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जखमींवर उपचार केले. जखमींना भंडारज येथून मिळेल त्या वाहनाने ग्रामिण रुग्णालयात पोहचवण्याचे काम सुरु होते. मात्र आज बाजाराचा दिवस असल्याने त्यातही रस्त्यावर बाजार भरत असल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात आणण्यात व अमरावती येथे पोहचवण्यात रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागाला. या रस्त्यावर तसेही नेहमी अवैध प्रवासी वाहने उभी राहत असल्यामुळे रुग्वाहिकेलाही अडथळा निर्माण होतो. (One killed, 19 injured in three-vehicle accident in Amravati)

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.