ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याच्या हातून एवढी मोठी चूक झालीच कशी…
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पुलवामा येथे एक पोलीस कर्मचारी आपली नियमित ड्युटी बजावत होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याच्या रायफलमधून अचानक गोळी सुटली.
जम्मू : ड्युटी बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून सर्विस रायफलचा (Service Rifle) ट्रिगर दाबला गेला अन् एका व्यक्तीला गोळी लागल्याची घटना जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama in Jammu-Kashmir) येथे उघडकीस आली आहे. जखमी व्यक्तीला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गोळीबारास जबाबदार पोलीस कर्मचाऱ्याला अटक (Police Arrest) करण्यात आली आहे. आरोपीची पुढील चौकशी सुरु आहे.
चुकून गोळी सुटली अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पुलवामा येथे एक पोलीस कर्मचारी आपली नियमित ड्युटी बजावत होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याच्या रायफलमधून अचानक गोळी सुटली आणि तेथे उपस्थित नागरिकाला लागली. यात सदर नागरिक गंभीर जखमी झाला.
जखमी नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
मोहम्मद आसिफ पाद्रू असे गोळीबारात मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. पाद्रू यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस कर्मचाऱ्याला अटक
याप्रकरणी काश्मीर झोन पोलिसात सदर पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अद्याप पोलीस कर्मचाऱ्याचा कोणताही जबाब नोंदवण्यात आला नाही.
याआधीही अनेकदा अशा प्रकारे मिस फायरिंगच्या घटना घडल्या आहेत. मात्र जीवितहानी झाली नव्हती. परंतु काल झालेल्या घटनेमध्ये एका निष्पाप नागरिकाला जीवाला मुकावे लागल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.