भरधाव वाहनावरील ताबा सुटला, भीषण अपघातात चालकाचा मृत्यू

घोडबंदर रोडहून ठाण्याच्या दिशेने चाललेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला. कारमधील दुसरा व्यक्ती जखमी असून, त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

भरधाव वाहनावरील ताबा सुटला, भीषण अपघातात चालकाचा मृत्यू
ठाण्यात कार अपघातात चालक ठारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 9:45 AM

ठाणे / निखिल चव्हाण : भरधाव कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार विद्युत खांबावर आदळून चालकाचा मृत्यू झाला आहे. घोडबंदर रोड मानपाडा येथे आज सकाळी एका गाडीचा भीषण अपघात झाला आहे. पदम मेघानी असे अपघातात मृत्यू झालेल्या 25 वर्षीय कारचालकाचे नाव आहे. कारमधील दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कापूरबावडी पोलीस, आपत्कालीन पथक आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

पदम मेघानी हा आपल्या ताब्यातील ह्युंडाई कारने भरधाव वेगात घोडबंदरकडून ठाण्याच्या दिशेने चालला होता. यावेळी त्याच्यासोबत कारमध्ये आणखी एक व्यक्ती बसला होता. मानपाडा येथे मेघानी याचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या महावितरणच्या विद्युत पोलला आदळली.

कार चालकाचा अपघातात मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच कापूरबावडी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. यावेळी कारमधील दोन व्यक्ती अडकल्या होत्या, त्यांना आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र कार चालक पदम मेघानी याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दुसऱ्या व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

बॅनरला धडकून दुचाकीवरील महिला जखमी

नांदेडमध्ये शिवाजीनगर भागात बॅनरला धडकून दुचाकीवर मागे बसलेली एक महिला जखमी झाली. अपघाताची ही घटना cctv कॅमेरात कैद झाली आहे. दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाचे हे बॅनर लावलेले होते. कार्यक्रम होऊन गेल्यावरही बॅनर काढले नसल्याने हा अपघात झाला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.