दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक, एक जण जागीच ठार

येवला कोपरगाव रस्त्यावर दोन्ही मोटारसायकल समोरासमोर आल्याने अनियंत्रित झाल्या आणि एकमेकींवर धडकल्या. अपघातात मोटारसायकलींचा चक्काचूर झाला. अपघात इतका भीषण होता की यात अशपाक इब्राहिम शाह याचा जागीच मृत्यू झाला.

दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक, एक जण जागीच ठार
येवल्यात बाईक अपघातात एक जण ठारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 10:21 AM

येवला / उमेश पारीक (प्रतिनिधी) : दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने मोटारसायकलवरील एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना येवला-कोपरगाव रस्त्यावर घडली. अशपाक इब्राहिम शाह असे अपघातात मृत्यू झालेल्या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. नानासाहेब गुळवे असे अपघातातील जखमी मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. जखमीवर येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर, त्याला कोपरगाव येथे पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशपाकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

दोघेही व्यक्ती आपापली कामे आटोपून घराकडे चालले होते

मयत अशपाक इब्राहिम शाह हा येवला येथील रहिवाशी असून, व्यवसायाने मिस्त्री आहे. कोपरगाव येथून काम आटोपून आपल्या मोटारसायकलने येवला येथे घराकडे चालला होता. जखमी नानासाहेब गुळवे हा कोपरगाव तालुक्यातील डाऊच येथील रहिवासी असून, येवला येथून घराकडे जात होता.

समोरासमोर आल्याने दोन्ही मोटारसायकल अनियंत्रित झाल्या

येवला कोपरगाव रस्त्यावर दोन्ही मोटारसायकल समोरासमोर आल्याने अनियंत्रित झाल्या आणि एकमेकींवर धडकल्या. अपघातात मोटारसायकलींचा चक्काचूर झाला. अपघात इतका भीषण होता की यात अशपाक इब्राहिम शाह याचा जागीच मृत्यू झाला. तर नानासाहेब गुळवे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर कोपरगाव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

धुळ्यात कार नदीत पडली

चालकाचे नियंत्रण सुटल्याने धुळे शहरातील पांझरा नदीमध्ये एक ओमनी कार पडल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील देवपूर परिसराकडे जाणाऱ्या पांझरा नदीवरील फरशी पुलावर ही घटना घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

फरशी पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या ठिकाणी वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी अपघात नित्याचे झाले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.