Pune Crime : एकतर्फी प्रेमातून त्याने केला तिचा पाठलाग, रस्त्यातच दिली प्रेमाची कबुली; आई समजवायला आली तर थेट…

Pune Crime News : पुण्यात गावगुंडाचा उपद्रव खूपच वाढला आहे. अशाच एका घटनेत एका तरूणाने एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. त्या मुलीने आईकडे तक्रार केल्यावर ती समजवायला आली असता...

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून त्याने केला तिचा पाठलाग, रस्त्यातच दिली प्रेमाची कबुली; आई समजवायला आली तर थेट...
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 12:17 PM

पुणे | 30 ऑगस्ट 2023 : एकतर्फी प्रेमात पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. समोरच्याकडून प्रेमाला तसाच रिस्पॉन्स मिळाला नाही तर त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अतरंगी गोष्टी केल्या जातात. मात्र कधीकधी हे एकतर्फी प्रेम धोकादायकही ठरू शकते. काहीवेळा ही गोष्ट छेडछाडीपर्यंतही जाऊ शकतं. जो एक गंभीर गुन्हा (crime news) ठरू शकतो. मात्र त्यानंतरही काही जण धोकादायक पाऊल उचलू शकतात. असंच एक प्रकरण पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. कोंढवा येथे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथे एक तरूण एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक दिवसांपासून एका शाळकरी मुलीचा पाठलाग करत होता. याप्रकरणी त्या मुलीने तिच्या आईकडे तक्रार केली. त्यानंतर तिच्या आईने त्याला समजावयचा प्रयत्न केला असता, त्या मुलाने तिच्या आईला थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी त्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश (वय २४) असे त्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

काय आहे आरोप ?

आरोपी तरूण हा त्या पीडित शाळकरी मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. पण ती मुलगी त्याला काही उत्तर देत नव्हती. म्हणून आरोपी तिचा कायम पाठलाग करत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. एके दिवशी पीडित तरूणी क्लास संपवून घरी जात असताना आरोपीने तिला रस्त्यात थांबवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यामुळे ती मुलगी खूप घाबरली, तिला मोठा धक्का बसला. तिने हा संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला.

आरोपीने दिली धमकी

हे सर्व समजल्यानंतर पीडितेच्या आईने जाऊन आरोपीला जाब विचारला. तेव्हा आरोपीने तिला थेट धमकी दिली. माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीत ना, आता तुम्हाला पाहून घेऊ. असे म्हणत त्याने तिला पुन्हा धमकावले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात त्वरित गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.