गॅंगस्टर बिष्णोईला हिरो टरविणाऱ्या टी शर्टची ऑनलाईन विक्री, पोलिसांनी केला गुन्हा दाखल
बाबा सिद्धी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचे छायाचित्र असलेले टी-शर्ट ऑनलाईन विकले जात असल्याचे उघडकीस आल्याने या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार उघडकीस आले आहे. लॉरेन्स बिष्णोई याची छबी असलेली टी-शर्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनलाईल विकली जात असल्याने या प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आता या प्रकरणात अशा टीशर्टची विक्री करणाऱ्या लोकांची चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी ऑनलाईन शॉंपिग करणाऱ्या वेबसाईटवर लॉरेन्स बिष्णोईची छबी असलेली टी-शर्ट विक्री करता ठेवली होती, त्यानंतर खळबळ उडाली होती.
अनेक ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लॉरेन्स बिष्णोई याचे चित्र असलेले टी-शर्टची विक्री सुरु होती. मीशो सह अनेक ई- कॉमर्स वेबसाईटवर लॉरेन्स बिष्णोई याचे फोटो छापलेले टीशर्ट विक्री केले जात असल्याचे उघडकीस आल्याने यांना आता वेबसाईटवरुन हटविण्यात आलेले आहे.
येथे पोस्ट पाहा –
People are literally selling gangster merchandise on platforms like @Meesho_Official and Teeshopper. This is just one example of India’s latest online radicalisation. Thread 1/n pic.twitter.com/vzjXM360q3
— Alishan Jafri (@alishan_jafri) November 4, 2024
या प्रकरणात चित्रपट निर्माता अलीशान जाफरी या टी – शर्ट प्रकरणात आवाज उठवला होता. त्यांनी एक फोटो समाजमाध्यमावर शेअर केला होता. या फोटोत टी-शर्टवर लॉरेन्स बिष्णोई याचा फोटो छापला होता. आणि त्याखाली गॅंगस्टर असेही लिहीलेले होते. जाफरी यांनी या प्रकरणात एक्सवर पोस्ट केली होती. त्यात जाफरी यांनी लिहीले की लोक मिशो आणि टीशॉपर सारख्या वेबसाईटवर गॅंगस्टरची टीशर्ट विकत आहे. हे भारतातील ऑनलाईन कंटरपंथीयाचे एक उदाहरण आहे. नंतर अनेकांनी फ्लिपकार्टवर देखील अशाच टी-शर्टची जाहीरात पाहीली. त्याची किंमत 166 रुपये होती.
सोशल मिडीयावर लोकांनी दावा केला की असे टी-शर्ट लहान मुलांकरीता विकले जात आहे. लॉरेन्स गॅंगमध्ये सामील अनेक शूटर कमी वयाचे आहेत. त्यांनी कमी वयात गॅंगस्टर बिष्णोई याच्या गॅंगला जॉईंड केलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे लहान मुलांच्या विचारधारेला चुकीच्या दिशेने नेण्याचा हा प्रयत्न असल्याने या विक्रीवर बंदी घालावी असे तक्रारदारांनी म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्र सायबर क्राइम शाखेने या प्रकरणात गुन्हा दाखल करुन बेवसाईटवरुन हा प्रकार हटवला आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. महाराष्ट्र सायबर क्राइम शाखेने या प्रकरणात उत्पादनाची निर्मिती आणि जाहीरात केल्या प्रकरणात सीआर क्रमांक 13/2024 यू/एस 192, 196, 353, 3 बीएनएस, 2023 आर/डब्ल्यू 67 आयटी कायदा 2000 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.