Online Shopping Fraud : ऑनलाइन ऑर्डर केला लाखोंचा टीव्ही, पण बॉक्स उघडल्यावर मात्र… त्या बॉक्समध्ये नेमकं काय होतं ?
मोठ्या स्क्रीनवर वर्ल्ड कपचा आनंद लुटण्यासाठी एका तरूणाने ऑनलाइन माध्यमातून एक लाख रुपयांचा टीव्ही ऑर्डर केला खरा... पण डिलीव्हरी मिळाल्यावर बॉक्समधून जे बाहेर आलं ते पाहून त्याचे डोळेच विस्फारले....
Online Shopping Fraud : घरी बसल्या बसल्या तुम्हालाही ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करण्याची सवय आहे का ? तर मग आजच सावध व्हा ! सणासुदीच्या काळात अनेकांना ऑनलाइन ऑर्डर करून विविध वस्तू मागवल्या पण पॅकेट्स उघडताच भलताच माल पदरात (fraud case) पडल्यामुळे ते हादरलेच… अशा अनेक घटना सध्या उघडकीस आल्या आहेत. नुकतीच आणखी एक घटना समोर (Online Shopping Fraud) आली, जी ऐकून तुम्हीदेखील हैराण व्हाल.
सध्या सर्वत क्रिकेट वर्ल्डकपचे वारे वहात आहेत. मोठ्या स्क्रीनवर वर्ल्ड कपचा आनंद लुटण्यासाठी एका तरूणाने Flipkart वरून सोनी ब्रँडचा लाखभर रुपये किमतीचा टीव्ही ऑर्डर केला. बऱ्याच दिवसांपासून वाट बघत असलेल्या त्या टीव्हीची डिलीव्हरी झाल्यामुळे तो तरूणही भलताच खुश होता. पण इन्स्टॉलेशन करण्यासाठी बॉक्स उघण्यात आला, तेव्हा त्यातून जी गोष्ट बाहेर पडली, त्यामुळे त्या तरूणाचे डोळेच विस्फारले. समोरील वस्तू पाहूना त्याला धक्काच बसला.
असं काय होतं बॉक्समध्ये ?
X या ( पूर्वीच ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @thetrueindian या हँडलद्वारे आर्यन नावाच्या युजरने काही फोटो शेअर करत त्याचा भयानक अनुभव सांगितला. या फोटोंमध्ये सोनी ब्रँडच्या टीव्हीचा बॉक्स आणि त्याची किंमत तर दिसते, पण त्या बॉक्सच्या आतून निघालेला टीव्ही मात्र थॉमसनचा आहे. आर्यनने याप्रकरणी फ्लिपकार्टला टॅग करत एक पोस्ट लिहीली आहे. ” मी 7 ऑक्टोबर रोजी सोनी टीव्हीची ऑर्डर दिली. 10 ऑक्टोबर रोजी टीव्हीची डिलीव्हरीही झाली. पण जेव्हा सोनी कंपनीद्वारे आलेल्या माणसाने जेव्हा तो बॉक्स उघडला, तेव्हा आम्ही दोघेही हादरलो. ” आर्यनच्या सांगण्यानुसार, बॉक्समध्ये असलेला टीव्ही सोनीचा नव्हे तर थॉमसन कंपनीचा होता. एवढंच नव्हे तर त्यासह येणारा रिमोट स्टँड आणि इतर सामानही गायब होतं.
मागवला सोनी टीव्ही पण आलं काही दुसरंच
I had purchased a Sony tv from @Flipkart on 7th oct, delivered on 10th oct and sony installation guy came on 11th oct, he unboxed the tv himself and we were shocked to see a Thomson tv Inside Sony box that too with no accessories like stand,remote etc 1/n pic.twitter.com/iICutwj1n0
— Aryan (@thetrueindian) October 25, 2023
फ्लिपकार्ट वर आणखी एक आरोप
यानंतर आर्यनने टीव्ही रिटर्न रिक्वेस्ट सबमिट केली, पण त्याला तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही फ्लिपकार्टकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. याउलट, फ्लिपकार्टने ती समस्या सोडवल्याचे (Issue Resolved) सांगून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. अखेर आर्यननने हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.
आर्यनची ही पोस्ट आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिली आहे. डिलीव्हरीच्या वेळीच तो बॉक्स उघडून तो तपासायला हवा होता, असा सल्ला अनेक युजर्सनी आर्यनला दिला. मात्र डिलीव्हरीच्या वेळेस आपल्याला हा ऑप्शनच देण्यात आला नव्हता, असा दावा आर्यन याने केला.