बंदुकीच्या धाकाने बलात्कार, विवाहितेची आत्महत्या, दोन सुसाईड नोट्सवरुन पोलिसालाच बेड्या

विवाहितेच्या सुसाईड नोटमध्ये पोलिसाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट होते. (Osmanabad lady suicide policeman rape)

बंदुकीच्या धाकाने बलात्कार, विवाहितेची आत्महत्या, दोन सुसाईड नोट्सवरुन पोलिसालाच बेड्या
Police
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 1:13 PM

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक भागातील विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्यानंतर महिलेने आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटवरुन समोर आलं आहे. या प्रकरणी पोलीस नाईक हरिभाऊ कोळेकर याच्यावर उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Osmanabad Crime married lady commits suicide after policeman allegedly rape her)

या प्रकरणी कलम 376 अन्वये बलात्कार आणि 306 अन्वये आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस नाईक हरिभाऊ कोळेकरला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली.

दोन सुसाईड नोट्समध्ये पोलिसाचा उल्लेख

घटनास्थळी दोन वेगवेगळ्या सुसाईड नोट सापडल्या आहेत. ज्यात पोलिसाच्या जाचाला कंटाळून महिलेने हे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट होते. उस्मानाबाद पोलीस दलातील दोन पोलिसांवर गेल्या 15 दिवसात बलात्कार गुन्हा नोंद झाल्याने खाकी वर्दी डागाळली आहे.

पहिली सुसाईड नोट –

मी ………… मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. याला जिम्मेदार हरिभाऊ रामदास कोळेकर असणार आहे. मी फाशी घेणार आहे, त्या कोळेकरच्या घरी कारण त्यानेच माझे वाटोळे केले. त्याने माझा पहिल्यांदा घरी येऊन रेप केला व त्याआधारे मला सारखे धमकावत होता, बंदुकीचा धाक दाखवून , यात माझ्या नवऱ्याचा काय दोष नाही

दुसरी सुसाईड नोट –

मी ………………… वय 32 मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. याला जिम्मेदार फक्त हरिभाऊ रामदास कोळेकर आहे. त्याने माझ्यावर घरी येऊन रेप केला व त्याआधारे मला धमकावू लागला , बंदुकीचा धाक दाखवत होता. (Osmanabad Crime married lady commits suicide after policeman allegedly rape her)

परंडातील घटनेतही पोलिसांवर बलात्काराचा गुन्हा

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात उकळत्या तेलातून 5 रुपयांचे कॉईन काढायला लावण्याचे प्रकरण उघड झाले होते. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमधे आरोपी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेच्या पतीविरोधात जातपंचायत निर्मूलन कायदा आणि भा. दं. वि. कलम 338 नुसार गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली

संबंधित बातम्या :

रिक्षाचालकाची हत्या, कॉन्स्टेबल पत्नीला अटक, पत्नीच्या पोलीस प्रियकरालाही बेड्या!

लैंगिक संबंधांची मागणी धुडकावली, डोंबिवलीत दुकानदाराच्या पत्नीच्या हत्येचं गूढ उकललं

चंदूचा मर्डर कर, मी तुला शय्यासुख देते, मित्राच्या प्रेयसीकडून सुपारी, बालमित्राची हत्या

(Osmanabad Crime married lady commits suicide after policeman allegedly rape her)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.