उस्मानाबादेत 11 वर्षीय बालिकेवर गँगरेप, चौघा अल्पवयीन तरुणांवर गुन्हा
अल्पवयीन बालिकेवर बलात्कार प्रकरणी पॉस्को अंतर्गत चारही अल्पवयीन आरोपींविरोधात लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात 11 वर्षीय बालिकेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार अल्पवयीन तरुणांना उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन तरुणी मंदिराजवळ खेळत असताना निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले होते. (Osmanabad Minor Girl Gang Rape Four accuse arrested)
नवरात्रौत्सवात नारी शक्तीचा जागर सुरु असताना तुळजाभवानीच्या उस्मानाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर या गावात घटना घडल्याचं दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलं होतं. चारही आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे.
बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींची ओळख पटली असून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. बलात्कार प्रकरणी पॉस्को अंतर्गत चारही अल्पवयीन आरोपींविरोधात लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुलीच्या कुटुंबियांनी जबाब दिला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी बलात्कार झाला होता, मात्र जबाब आणि तक्रार न दिल्याने गुन्हा नोंदवण्यात उशीर झाल्याची माहिती आहे.
अत्याचार झाल्यानंतर पीडित बालिका पोटदुखी आणि रक्तस्त्रावामुळे त्रस्त होती. पीडितेचे आई-वडील शेत मजूर आहेत. बलात्कारानंतर सास्तूर येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन तिला पुढील उपचारासाठी लातूरला पाठवण्यात आले. बालिकेची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे. तिच्यावर लातूरमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, लातूरमधील औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पीडितेची दवाखान्यात जाऊन भेट घेतली. त्यांनी तिच्या आई -वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी तिच्या आई-वडिलांनी केली आहे. (Osmanabad Minor Girl Gang Rape Four accuse arrested)
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 21 October 2020 https://t.co/d5aSC208gT
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
संबंधित बातम्या :
बलात्काराचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक; महिला अत्याचार रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर
मेळघाटात महिलेवर सामूहिक बलात्कार, तात्काळ कारवाई करा, भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा
(Osmanabad Minor Girl Gang Rape Four accuse arrested)