घरातलं मटण कुत्र्याने खाल्लं म्हणून मुलीची हत्या करणारा तब्बल 2.5 महिन्यांनी गजाआड! कुठे लपलेला?

संपातलेल्या पित्याने झाडल्या पोटच्या पोरीवर गोळ्या! अडीत महिन्यांपूर्वी घडलेल्या उस्मानाबाद येथील हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा

घरातलं मटण कुत्र्याने खाल्लं म्हणून मुलीची हत्या करणारा तब्बल 2.5 महिन्यांनी गजाआड! कुठे लपलेला?
धक्कादायक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 9:27 AM

उस्मानाबाद : घरात शिजवलेलं मटण कुत्र्याने खाल्लं, याचा राग मनात ठेवून संपातलेल्या पित्याने मुलीवर गोळ्या झाडल्या होत्या. यात मुलीचा मृत्यू झालेला. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात कार्ला इथं अडीच महिन्यांपूर्वी घडलेल्या या धक्कादायक हत्याकांडप्रकरणी आता मोठा खुलासा झालाय. या हत्याकांड प्रकरणी फरार असलेल्या मुलीच्या पित्याला पोलिसांनी अटक केलीय. गेले अडीच महिने मृत मुलीचे वडील फरार होते. अखेर त्यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. अडीच महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली होती. उस्मानाबाद येथील नळदुर्ग पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल केला होता. 18 सप्टेंबर रोजी हे हत्याकांड घडलं होतं.

मुलीची हत्या करन फरार असलेल्या बापाच्या पोलीस मागावर होते. गेले अडीच महिने तो कुठे लपून बसला होता, यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरु केला होता. दरम्यान आयटी विभागाच्या मदतीने पोलिसांना अखेर मारेकरी बापाचा शोधही लागला होता.

सांगली जिल्ह्यातील चिखली इथं एका शेतातील घरात तो वास्तव्य करत असल्याची माहिती क्राईम ब्रांच पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपाला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. या अडीच महिन्यांच्या काळात तो सतत जागा बदल होता. पोलिसांना गुंगारा देण्याचा त्याचा हा प्रयत्न अडीच महिन्यांपर्यंत यशस्वी झाला. पण अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याच.

काय आहे प्रकरण?

काजल शिंदे नावाची मुलगी माहेरी आली होती. आई-वडिलांसोबत राहत असताना ती घरी काम करत होती. एके रविवारी माहेरी मटण आणलं गेलं होतं. मटणाची ग्रेव्ही बनवून काजल इतर कामाला लागली.

यावेळी कुत्र्याने मटण खाल्ल्याचं काजलच्या आईच्या निदर्शनास आलं. हे पाहून काजलच्या आईला राग आला. मुलीनं मटण शिजवून झाल्यानंतर लक्ष दिलं नाही, म्हणून ते कुत्र्याने फस्त केलं, असं म्हणत काजलची आई तिच्यासोबत वाद घालू लागली. काजलनेही उलट उत्तरं देण्यास सुरुवात केली.

इतक्यात काजलचे वडील दारुच्या नशेत असताना त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला. नशेत आणि संतापाच्या भरात त्यांनी खुंटीवर टांगलेली गावठी बंदूक काढली आणि त्यातून थेट काजलवर निशाणा लावला.

यावेळी गोळी थेट काजलच्या छातीत घुसली. गंभीररीत्या जखमी झालेली काजल रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिच्या इतर नातलगांनी तिला रुग्णालयात नेलं. पण उपचाराआधी रुग्णालयात नेत असताना तिची प्राणज्योत मालवली. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनीही काजलच्या वडिलांवर गुन्हा नोंदवून घेतला होता.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.