Osmanabad Crime : भयंकर! उस्मानाबादेत दहावीतली मुलगी गरोदर, नंतर कळलं शिक्षकानेच बलात्कार केलाय, गुन्हा दाखल

Osmanabad Rape News : नराधम शिक्षकाने केलेल्या या कृत्यामुळे कळंब मध्ये संताप व्यक्त केला जातोय.

Osmanabad Crime : भयंकर! उस्मानाबादेत दहावीतली मुलगी गरोदर, नंतर कळलं शिक्षकानेच बलात्कार केलाय, गुन्हा दाखल
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 11:47 AM

उस्मानाबाद : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उस्मानाबादेत (Osmanabad Crime News) घडली. एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर वारंवार बलात्कार (Osmanabad Rape) केला. ही विद्यार्थीनी गरोदर राहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक अमित माळी विरोधात पोलिसांनी कळंब पोलीस ठाण्यात (Teacher raped student) गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील सावित्रीबाई प्राथमिक विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. कलम 376,(2)(फ) भा.द.वि. सह 4, 8, 12 आण बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलगी दहावीची विद्यार्थीनी असून तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसलाय. पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्यानंतर हे भयंकर प्रकरण उघडकीस आलंय.

भयंकर घटना…

दहावीत शिक्षणाऱ्या या विद्यार्थीनीवर नराधम शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. गेले अनेक दिवस हा नराधम शिक्षक मुलीचा लैगिंक छळ करत होता, असा आरोप करण्यात आलाय. ही मुलगी एके दिवशी स्कुटीवरुन प्रवास करत होती. त्यावेळी तिला अचानक रक्तस्त्रावाचा त्रास सुरु झाले. त्यामुळे या मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे या मुलीची तपासणी केल्यानंतर ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यानंतर पीडित मुलीचे कुटुंबीय हादरुन गेले होते.

व्हॉट्सएपवर चॅटिंग

नराधम शिक्षकाने केलेल्या या कृत्यामुळे कळंब मध्ये संताप व्यक्त केला जातोय. तसंच विद्यार्थीनींच्या पालकांमध्ये भीती पसरली आहे. व्हॉट्सअप द्वारे चॅटिंग करून कळंब येथील फिर्यादीच्या आत्याच्या घरी इतर कोणी नसताना इच्छेविरुद्ध या शिक्षकाने संबंध ठेवले आणि तिचा बलात्कार केला.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, मुलीची कुटुंबीयांनी विचारपूस केली. तेव्हा याप्रकरणी अधिक खुलासा झाला. अखेर मुलीनेच या शिक्षकाविरोधात जबाब दिलाय. आता कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत या शिक्षकाला अटकही केली आहे. तसंच या शिक्षकाला दोन दिवसांची पोलीस कोठडीदेखील सुनावण्यात आलीय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.