Mumbai Crime : कुरिअर स्कॅमचा धसका, शेअर ब्रोकरला लाखोंचा फटका; असा घडला गुन्हा

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. मात्र त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. फसवणुकीच्या नवनवीन घटना आणि त्याचे लाखो प्रकार रोज कानावर पडत असतात.

Mumbai Crime : कुरिअर स्कॅमचा धसका, शेअर ब्रोकरला लाखोंचा फटका; असा घडला गुन्हा
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 9:13 AM

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. मात्र त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. काही दिवंसापूर्वीच एका माजी पोलिस अधिकाऱ्याला ऑनलाइन स्कॅमचा फटका बसला होता. ऑनलाइन जाहिरात पाहून वेबसाईटवर जाऊन त्या्नी ड्रायफ्रुट्स ऑर्डर केले होते, मात्र त्यामध्येही त्यांची फसवणूक करून हजारो रुपये लुटण्यात आले. आता मुंबईतून कुरिअर स्कॅमचे एक नवे प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये एका इसमाला लाखो रुपये गमवावे लागले. बँक खात्यातून परस्पर लाखो रुपये वळवण्यात आल्याने मोठा धक्का बसला.

कुरिअरच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाणबही बरेच वाढले आहे. अशाच एका स्कॅमचा फटका एका शे्र ब्रोकरला बसला. जुहू येथील एका शेअर ब्रोकरने मुरादाबाद येथून एक भेटवस्तू ऑर्डर केली होती. त्याला ते कुरिअर 10-12 दिवसांमध्ये मिळणे अपेक्षित होते. पण अपेक्षित कालावधी उलटून गेल्यावरही ते सामान न आल्याने त्या शेअर ब्रोकरने मुरादाबाद येथे संपर्क साधून चौकशी केली असत, त्यांना अंजनी कुरियरचा डॉकेट क्रमांक देण्यात आला. त्यानंतर शेअर ब्रोकरने कस्टमर केअर क्रमांक डायल करून तिथून त्या कुरिअरबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुम्हाला दोन रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले.

त्या शेअर ब्रोकरने हे पैसे भरण्याची तयारी दर्शवली, तेव्हा त्याला पैसे पाठवण्यासाठी एक लिंक देण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करून जीपेवरून तो पैसे पाठवत असताना अचानक 4 हजार 999 रुपयांची रक्कम, अशी आठ वेळा काढण्यात आली. याबाबत कोणताही संदेश न आल्याने समोरील व्यक्तीने क्रेडिट कार्डचा वापर करण्यास सांगितले

मात्र त्या शेअर ब्रोकरने क्रेडिट कार्डचा वापर करताच त्यातून 80 हजार रुपये परस्पर काढण्यात आले. सगळे पैसे मिळून एकूण एक लाख 20 हजार रुपये शेअर ब्रोकरच्या खात्यातून काढण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

गोल्डन थाळीचा मोह नडला, 50 रुपयांच्या थाळीसाठी गमावले हजारो रुपये !

काही महिन्यांपूर्वी एका ग्राहकाची अशीच ऑनलाइन माध्यमातून फसवणूक करण्यात आली होती. अवघ्या 50 रुपयांच्या थाळीसाठी तक्रारदार व्यक्तीने हजारो रुपये गमावले. ऑनलाइन ऑफरच्या मोहात पडल्याने त्याला चांगलाच मोठा फटका बसला. पीडित व्यक्ती ही दक्षिण मुंबईतील असून त्या व्यक्तीने जून महिन्यात सोशल मीडियावर एक जाहिरत पाहिली. होलसेल दरात जेवणाची गोल्डन थाळी मिळत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. फोटोतील पदार्थ पाहून ती थाळी मागवण्याचा मोह त्या व्यक्तीला झाला. आणइ ही थाळी अवघ्या 50 रुपयांमध्ये मिळत असल्याचे पाहून तर त्यांनी ऑर्डर देण्याचे ठरवले.

त्यासाठी त्यांनी त्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या लिंकवर क्लिक केले आणि त्यात त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर तसेच क्रेडिड कार्डची माहितीदेखील भरली. संबंधित थाळीचे 50 रुपये भरण्यासाठी त्यांना मोबाईलवर एक ओटीपी आला. हा नंबर शेअर करताच त्यांच्या अकाऊंटमधून तब्बल 38 हजार रुपये डेबिट (वजा) झाले. सायबर गुन्हेगारांनी त्यांना हा हजारोंचा चुना लावला. त्यामुळे अवघ्या 50 रुपयांच्या थाळीच्या मोहापायी आपल्याला 38 हजार रुपये गमवावे लागल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे पीडित व्यक्तीच्या लक्षात आले. अखेर त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पाच महिने तपास करून याप्रकरणातील दोन आरोपींना अहमदाबाद येथून अटक केली. ऑनलाइन फसवमुकीचे गुन्हे वाढले असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.