…म्हणून मालकाने मजुराचे नाक कापले
या घटनेत मजुर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जालौन : मजुरी मागितली म्हणून मालकाने कापले मजुराचे नाक कापले आहे. उत्तरप्रदेशच्या जालौन जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मालकाच्या या अमानवीय कृत्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे.
या घटनेत मजुर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मजुराने आपल्या कामाची मजुरी मालकाजवळ मागितली. मात्र मालकाने पैसे देण्यास नकार देत नाक कापल्याची तक्रार या मजूराने केली आहे.
रविवारी सायंकाळी हा मजूर मालकाच्या शेतात मजुरी मागण्यासाठी गेला होता. काम संपल्यानंतर त्याने काम केल्याचे पैसे मागितले.
मी कामाची मजुरी मागितली तेव्हा मालक चिडला आणि रागाच्या भरात मला मारहाण केली. त्यानंतर मालकाने धारधार वस्तुने माझे नाक कापल्याचे मजुराने पोलिस तक्रारीत म्हंटले आहे.
या घटनेनंतर जखमी अवस्थेतील मजुराला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रागाच्या भरात मालक लालू यांनी त्यांना मारहाण केल्याचे मजुराने पोलिसांना सांगीतले.
मालकाने त्याची 2 हजार रुपये मजुरी देणे बाकी होते असे या मजुराचे म्हणणे आहे. मजुरीचे पैसे मागितले असता मालकाने मारहाण करण्यास सुरुवात केली.
रेंधार पोलिस स्टेशन परिसरातून एक 45 वर्षीय जखमी जनबेद येथे आला होता, त्याचे नाक कापले गेले होते आणि जखमेच्या खुणा होत्या असे जिल्हा रुग्णालयात तैनात असलेले डॉक्टरांनी सांगितले. उपचारानंतर या मजुराला घरी सोडण्यात आले.
या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मालकाविरोधात काहीच कारवाई केलेली नाही.