PUNE : पाकिस्तानचा तरुण भवानी पेठेत, बनावट कागदपत्राद्वारे पासपोर्ट मिळवला, शेवटी खबर लागली अन्..
तरुण राहत असलेल्या ठिकाणी काही वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे तरुण नेमका कोणत्या कारणासाठी इथं राहत होता, हे सुध्दा स्पष्ट होईल.
पुणे : पुणे (PUNE CITY) शहरातील खडक पोलीस स्टेशनच्या (khadak police station) हद्दीतील भवानी पेठ (bhavani peth) 2015 पासून एका पाकिस्तानी तरुणाने बेकायदेशीर वास्तव्य केल्याचे उघडकीस आले आहे. भवानी पेठेतील चुडामन तालीम जवळ तो राहात होता, अशी माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. मोहम्मद अमान अन्सारी (वय 22) असे या तरुणाचे नाव आहे. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याच्यासोबत आणखी किती जण आहेत, त्याचबरोबर इथे राहून त्याने काय काम केले या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यात येणार आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मोहम्मद अन्सारी हा 2015 पासून भवानी पेठेतील चुडामन तालीम जवळ बेकायदेशीररित्या राहत असल्याचे उघड झाले आहे. त्याने पुण्यात बनावट कागदपत्र तयार करून पासपोर्टही मिळवला आहे. त्याचबरोबर पासपोर्टच्या आधारे त्याने पुणे ते दुबई असा प्रवासही केला आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू अशी माहिती डी. राजा, पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांनी दिली.
पाकिस्तानी माणूस सापडल्यामुळे पुण्यात चांगलीचं चर्चा रंगली आहे. मागच्या आठ वर्षापासून हा इसम इथं राहतोय, परंतु कुणालाही त्याची कल्पना नाही. त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद अमान अन्सारी याचं वय कमी असल्यामुळे हा तरुण भारतात राहून नेमकं काय करीत होता असा अनेकांना प्रश्न पडला आहे. पोलिसांनी तो राहत असलेल्या परिसरात चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या वस्तू सुध्दा ताब्यात घेतल्या आहेत.
तरुण राहत असलेल्या ठिकाणी काही वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे तरुण नेमका कोणत्या कारणासाठी इथं राहत होता, हे सुध्दा स्पष्ट होईल.