पालघरमधील पतपेढी संचालिकेच्या हत्येचा 24 तासात छडा, ऑफिससमोर राहणारा आरोपी जेरबंद

अष्टविनायक नागरी सहकारी पतपेढीच्या 53 वर्षीय संचालिका साधना रामकृष्ण चौधरी यांची दोन दिवसांपूर्वी हत्या झाली होती. (Palghar Sadhana Chaudhari Murder accuse arrest)

पालघरमधील पतपेढी संचालिकेच्या हत्येचा 24 तासात छडा, ऑफिससमोर राहणारा आरोपी जेरबंद
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 12:10 PM

पालघर : अष्टविनायक नागरी सहकारी पतपेढीच्या संचालिकेच्या हत्येप्रकरणी 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. साधना रामकृष्ण चौधरी यांची हत्या करणाऱ्या विनोद त्रिवेदीला पालघर पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे ज्या इमारतीत हे हत्याकांड घडले, त्याच्यासमोरच आरोपी राहत होता. (Palghar Bank Director Sadhana Chaudhari Murder accuse arrest)

अष्टविनायक नागरी सहकारी पतपेढीच्या 53 वर्षीय संचालिका साधना रामकृष्ण चौधरी यांची दोन दिवसांपूर्वी हत्या झाली होती. ऑफिसमध्ये काम करताना संध्याकाळच्या सुमारास डोक्यावर धारदार हत्याराने वार करुन साधना चौधरींना जीवे मारण्यात आले होते.

पतपेढी संचालिकेच्या हत्येने खळबळ

पालघर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शुक्ला कंपाऊंड परिसरात हा प्रकार घडला होता. ओम शांती देवा इमारतीत श्री अष्टविनायक नागरी सहकारी पतपेढी आहे. साधना रामकृष्ण चौधरी तिथे संचालिका म्हणून कार्यरत होत्या.

कार्यालयात काम करताना दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी धारदार शस्त्राने घाव घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. रक्तबंबाळ अवस्थेत चौधरी यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी 24 तासात आरोपीला पकडलं

हत्येची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यासह फॉरेन्सिक पथक, एलसीबी पथक आणि पालघर पोलीस यांनी घटनास्थळी तपास सुरु केला. पालघर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी 24 तासात हत्या प्रकरणाचा गुंता सोडवून आरोपी विनोद त्रिवेदीला अटक केली. (Palghar Bank Director Sadhana Chaudhari Murder accuse arrest)

आरोपीने साधना चौधरी यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. ज्या इमारतीच्या कार्यालयात खून झाला, आरोपी त्याच्या समोरच राहतो. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

लग्न मोडल्याचा मनात राग, भल्या पहाटे आईसह मुलीचं अपहरण; पुढे काय?

भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीचा कट, हनी ट्रॅपने आरोपीला छोटा काश्मिरात बोलावलं, पण…

(Palghar Bank Director Sadhana Chaudhari Murder accuse arrest)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.