Palghar Crime : कॉलेजला चालत निघाली, तेवढ्यात मागून त्याचा जीवघेणा वार.. स्वत:लाही संपवलं, पण का ?

मोखाडा येथे एका विद्यार्थिनीची भरदिवसा हत्या झाल्यान दहशतीचं वातावरण पसरलं. याप्रकरणाचा तपास करत पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र शनिवारी सकाळी याप्रकरणाला वेगळेच, नवे वळण मिळाले.

Palghar Crime : कॉलेजला चालत निघाली, तेवढ्यात मागून त्याचा जीवघेणा वार.. स्वत:लाही संपवलं, पण का ?
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 10:31 AM

मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : महिलांविरोधातील गुन्हे दिवसेंदिवस (crime news) वाढतच चालले आहेत. ते रोखण्यासाठी कठोर कायदे येऊनही गुन्हेगारांना वचक बसत नाहीये. पोलिसही या गुन्ह्यांना आळा घालण्यास असमर्थ ठरत आहेत. असाच एक गंभीर गुन्हा (crime case in palghar) पालघर जिल्ह्यातील दुर्गम अशा मोखाडा तालुक्यात घडला आहे. तेथे भरदिवसा एका अल्पवयीन विद्यार्थिनीची खुलेआम हत्या (murder news) करण्यात आली. शुक्रवारी घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र दहशतीच वातावरण पसरलं होतं.

याप्रकरणी पोलिस गुन्हेगाराचा शोध घेत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. त्या विद्यार्थिनीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:चं आयुष्यही संपवले. त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. पण एकंदर याप्रकरणामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर वाघारे असं मृत आरोपीचं तर अर्चना असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. ती पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता 12 वीत शिकत होती. शुक्रवारी अर्चना तिच्या कॉलेजच्या दिशेन जात होती, प्रभाकर अचानक मागून आला आणि त्याने भरदिवसा कोयत्याने गळा चिरून तिची हत्या केली. या घटनेने एकच खळबळ माजली. तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून प्रभाकर वाघारे जंगल वाटेने पळून गेला होता. पोलीस त्याचा शोधत असताना आज (शनिवार) सकाळी प्रभाकरचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याप्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

का उचललं टोकाचं पाऊल ?

अर्चना आणि प्रभाकर एकमेकांना आधीपासून ओळखत होते. हळूहळू त्यांचे एकमेकांवर प्रेम जडलं. पण अर्चनाच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं. हे ऐकून प्रभाकर बिथरला. अर्चना दुसऱ्या कोणाची होईल, हा विचारच त्याला सहन झाला नाही. त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलत आधी त्याच्या प्रेयसीची हत्या केली. मात्र तिच्याशिवाय जगणं अशक्य असल्याने त्याने गळफास घेऊन स्वतःचं आयुष्यही संपवलं. मोखाडा पोलिसांनी सदर घटनास्थळी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.