पालघर : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील (Mumbai-Ahmadabad Highway) एका विचित्र प्रकार समोर आलाय. एका टेम्पोनं बाईकला (Bike Accident Video) धडक दिली. या धडकेनंतर चक्क बाईकला दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत टेम्पोनं अक्षरशः फरफटत नेलं होतं. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओही (Palghar Accident News) समोर आलाय. एका गाडीतून हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आलाय. हायवेवर बाईक फरफटत घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकानं केलेला जीवघेणा प्रकार अनेक सवाल उपस्थित करणारा होता. टेम्पो चालकानं बाईकला आधी धडक दिली. त्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्न बाईक टेम्पोच्या मागच्या बाजूला अडकली होती. अडकलेली बाईक तशी च फरफटत नेत टेम्पोचालकानं महामार्गावरुन जाणाऱ्या सगळ्यांचाच जीव धोक्यात घातला होता.
ही घटना 25 मे रोजी घडली. मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास टेम्पोनं बाईकला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच कोसळला होता. तर बाईक टेम्पोमध्ये अडकली होती. ईश्वर पाचलकर असं जखमी दुचाकीस्वाराचं नाव आहे. सध्या जखमी दुचाकीस्वारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
टेंपोच्या चालकाने बाईकला धडक दिल्यानंतर टेंपो न थांबवता तसाच सुसाट वेगात पुढे नेला. टेम्पोमध्ये अडकलेल्या मोटारसायकलला ओढत नेत गुजरातपर्यंत टेम्पो चालक पळाला होता आणि अंधाराचा फायदा घेऊन टेंपो थांबवून चालक पसार झाला होता. अखेर तलासरी पोलिसांनी हा टेम्पो आणि बाईक ताब्यात घेतलाय. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Video | Palghar | अहमदाबाद महामार्गावर टेंपो आणि दुचाकीचा भीषण अपघात#Ahmedabad #TruckAccident #Bike #ViralVideo #GujratBorder pic.twitter.com/27N5cA28NN
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2022
टेंपोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकलस्वार महामार्गावरच गंभीर जखमी होऊन पडला होता. काही ग्रामस्थांनी त्याला तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी सेलवास येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.