मुंबई : पालघर साधू सामुहिक हत्याकांड (Palghar Sadhu massacre) प्रकरणातील 10 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं(Mumbai High Court) त्यांना जामीन मंजूर केलाय. या आरोपींची ओळख न पटल्यानं, पुराव्याअभावी 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर 10 आरोपींना सशर्त जामीन (Conditional bail) मंजूर करण्यात आला आहे. तर 8 आरोपींचा हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असल्याचं पुराव्यासह निष्पन्न होत असल्याचं सांगत त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल 2020 रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेतून चोर समजून गुजरातमधील सुरत इथं अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निघृणपणे हत्या दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.
BREAKING: Bombay High Court grants bail to 10 out of 18 accused persons who applied for bail in the Palghar Sadhu lynching case(s). A total of 126 persons have been accused in the case#palgharsadhus pic.twitter.com/3B3XTevjx5
— LawBeat (@LawBeatInd) April 1, 2022
गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली होती.
पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत 101 जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.
साधू हत्याकांड प्रकरणात राज्य सरकारकडून पोलिसांवरही कारवाई करण्यात आली होती. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार 15 पोलिसांच्या पगारामध्ये कपात करण्याची शिक्षा देण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, तर दोन जणांना सेवा निवृत्तीवर पाठवले आहे.
इतर बातम्या :