पोलीस कोठडीत वाढ झाली, पण सोन्याचा शर्ट सापडेनाच, गोल्डमॅनने पोलिसांची वाढवली डोकेदुखी, पाहा कशी?
गुन्हा दाखल झाल्यापासून पंकज पारख हा फरार होता. 14 महीने झाले तरी पंकज पारख हा पोलिसांना सापडत नव्हता.
नाशिक : आपल्या वाढदिवसाला सोन्याचा शर्ट खरेदी करत तो परिधान केल्याने संपूर्ण महाराष्ट्रसह जगभरात ( Maharashtra Police ) येवल्यातील पंकज पारख ( Goldenman Pankaj Parakh ) चर्चेत आले होते. काही वर्षांपासून पंकज पारख यांची गोल्डमॅन म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे हा पंकज पारख येवला नगरपरिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे. त्यामुळे पंकज पारख यांचे राजकीय संबंध आणि व्यावसायिक क्षेत्रात असलेले संबंध पाहता पंकज पारख याला अटक झाल्यावर अनेकांच्या भुवया उंचवायला आहे. नुकतीच दहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी ( Nashik Police ) न्यायालयाने दिली आहे.
नाशिकच्या येवला येथील सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थेचा पंकज पारख हा संस्थापक-संचालक होता. त्यामध्ये पारख याच्यासह इतर 17 संचालकांवर अपहाराचा गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून पंकज पारख हा फरार होता. 14 महीने झाले तरी पंकज पारख हा पोलिसांना सापडत नव्हता, नाशिकच्या ग्रामीण पोलिसांचे पथक पंकज पारखच्या मागावर होते.
पंकज पारख हा काळ्या काचेच्या गाडीतून तिडके कॉलनी परिसरात बाहेर चालला होता, मात्र पोलिसांना माहिती मिळताच पोलीसांनी त्याला सापळा रचून अटक केली होती.
पोलीसांनी अटक केल्यानंतर पंकज पारख यांच्या घरातील मालमत्तांचे कागदपत्रे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, तब्बल दीड कोटी रुपयांचा शर्ट कुठे आहे याबाबत अद्यापही माहिती मिळत नाहीये.
पारख याच्याकडून हा शर्ट विक्री केला आहे याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, तो शर्ट कुणाला विक्री केला आहे, किती पैशांना विक्री केला आहे, त्या शर्ट खरेदी करणारा व्यक्ती कोण आहे ? याबाबत माहिती पारख देत नाहीये.
पारख याच्या अशा भूमिकेमुळे पोलीसांसमोर अडचणी निर्माण होत आहे. नुकतीच त्याची दहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.
पंकज पारख कारवाई दरम्यान सहकार्य करीत नसल्याचेही बोललं जात आहे. याबाबतचा दावा सुनावणी दरम्यान करण्यात आला आहे. बँकेच्या संबंधित जवळपास 93 कागदपत्रे पारखने लपविल्याचा अंदाज आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत आता कसून तपास सुरू केला आहे.
गोल्डमॅनची किडनी निकामी- येवल्याचा माजी नगराध्यक्ष आणि सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष पंकज पारख याची एक किडनी निकामी असल्याची माहिती समोर आली आहे. गोल्डमॅनची यापूर्वीच एक किडनी निकामी असल्याची वैद्यकीय तपासणी दरम्यान समोर आले आहे.