मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह आऊट, आता होमगार्डची जबाबदारी!

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन अखेर परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळे (Hemant Nagrale Mumbai Police commissioner) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह आऊट, आता होमगार्डची जबाबदारी!
परमबीर सिंह.
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 5:45 PM

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन अखेर परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची चौकशी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’ बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुप्त खलबते सुरु होती. या बैठकीत परमबीर सिंह यांची जागा कायम राहणार असल्याचं ठरलं, असं बोललं जात होतं. मात्र आजही वर्षा बंगल्यावर मोठी खलबतं झाल्यानंतर, अखेर दुपारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं. आता परमबीर सिंग यांच्या जागी  महाराष्ट्राचे विद्यमान पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale Mumbai Police commissioner) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वर्षावर रात्री खलबतं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale), मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात काल वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीचा तपशील कळू शकला नव्हता. मात्र अखेर आज हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.

बैठकीत काय घडलं?

या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर दीर्घ काळ चर्चा झाली. मंगळवारी रात्री साधारण आठ वाजता ही बैठक सुरु झाली. मध्यरात्री 12 च्या सुमारास ही बैठक आटोपून मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरुन परतले. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज पुन्हा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.

कोण आहेत परम बीर सिंह? • परम बीर सिंह हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. • त्यांनी महाराष्ट्र पोलीस विभागात अनेक पदांवर काम केलं. • लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक पद सांभाळलं. • ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते. • परम बीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.

(Param Bir Singh to remain Mumbai Police Commissioner Varsha Meeting Decision)

‘एनआयए’कडून वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी होण्याची शक्यता

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. ‘एनआयए’कडून सुरु असणारा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या सगळ्या कटाची सूत्रे मुंबई पोलीस दलातील एका IPS अधिकाऱ्याने हलवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे आता ‘एनआयए’कडून या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी ‘एनआयए’ने गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

पवारांचा परम बीर सिंहांना हटवण्याचा आग्रह 

दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असल्याचं बोललं जातं. परंतु ही बदली आता टळली आहे.

संबंधित बातम्या :

वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; परमबीर सिंह, गृहमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंची 4 तास चर्चा

NIA च्या चौकशीत धक्कादायक माहिती; वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याचं मशीन; फेसशिल्ड आणि कॅप जाळली

 सचिन वाझेंनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट का रचला; NIA चा मोठा खुलासा

पीपीई कीटमधील ती व्यक्ती सचिन वाझेच; CIU च्या कर्मचाऱ्याची कबुली?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.