पालकांविरोधात जाऊन दिली प्रियकराची साथ, आईबापाने पोटच्या गोळ्यालाच… धक्कादायक घटनेने सर्वच हादरले

पालकांनी सांगितलेले काम करण्यास नकार दिल्याने आई-वडिलांनी स्वत:च्या मुलीचच आयुष्य उध्वस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पालकांविरोधात जाऊन दिली प्रियकराची साथ, आईबापाने पोटच्या गोळ्यालाच... धक्कादायक घटनेने सर्वच हादरले
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 1:56 PM

मुझफ्फरनगर | 28 ऑगस्ट 2023 : किडनॅपिंग आणि अत्याचाराच्या खोट्या केसमध्ये प्रियकराविरोधात साक्ष देण्यासाठी नकार दिल्याने आई-वडिलांनी त्यांच्याच मुलीचं आयुष्य संपवल्याची (crime news) धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्यांची ही लेक आठ महिन्यांची गर्भवती (pregnant daughter) होती. मात्र पालकांनी कोणतीही दया-माया न दाखवता मुलीचा जीव घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर त्यांनी मुलीचा मृतदेह नदीत फेकून दिला. शाहपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोयला गावात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

मृत मुलीने तिच्या आई-वडिलांचे ऐकले नाही. तिचा पार्टनर राहूल याच्या विरोधात पालकांनी अपहरण आणि बलात्काराची तक्रार दाखल केली होती. व मुलीने त्याच्याविरोधात साक्ष द्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांच्या मुलीने प्रियकराच्या विरोधात साक्ष देण्यास नकार देत आई-वडिलांचे म्हणणे ऐकले नाही. यामुळे संतापलेल्या पालकांनी आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली व त्यानंतर तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. याप्रकरणी मृत महिलेच्या पालकांना अटक केली असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

नक्की काय झालं ?

पीडित मुलगी ही गेल्या वर्षी, आक्टोबर 2022 मध्ये, राहूल या तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र पालकांच्या तक्रानीनंतर डिसेंबर महिन्यात पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि राहूल याला तुरूंगात टाकले. त्याच्याविरोधात अपहरण आणि बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टात खटला सुरू होता. शनिवारी पीडित मुलीला तिच्या प्रियकराविरोधात न्यायालयात साक्ष द्यायची होती. मात्र तिने पालकांना विरोध करत, प्रियकराविरोधात काहीही बोलण्यास नकार दिला. यामुळे ते संतापले आणि त्यांनी तिचा जीवच घेतला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.