Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईहून दुबईला चालला होता व्यक्ती, विमानतळावर तपासणी दरम्यान बॅगेत सापडले घबाड

एक व्यक्ती मुंबईहून दुबईला चालला होता. विमानतळावर येताच त्याने बॅगा तपासणीसाठी दिल्या. यानंतर तो थेट सीआयएसएफच्या ताब्यात गेला.

मुंबईहून दुबईला चालला होता व्यक्ती, विमानतळावर तपासणी दरम्यान बॅगेत सापडले घबाड
मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह एकाला अटकImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 12:07 PM

मुंबई : मुंबई विमानतळावर एका व्यक्तीला परदेशी चलनासह अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती मुंबईहून दुबईला चालला होता. विमानतळावर तपासणी करताना बॅगेतून 3 कोटी रुपयांचे परदेशी चलन घेऊन दुबईला चालला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) मंगळवारी ही कारवाई केली. सीआयएसएफ अधिकारी सदर इसमाची सखोल चौकशी करत आहेत. हे परकीय चलन त्याने कुठून आणलं, याबाबत चौकशीअंतीच सर्व स्प।्ट होईल. सीआयएसएफच्या चौकशीत हा माणूस जास्त प्रमाणात परकीय चलन बाळगण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकला नाही. यानंतर त्याला सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

स्कॅनरमध्ये तपासणीसाठी बॅग टाकल्यानंतर प्रकार उघड

मुंबई विमानतळावर एक इसम मंगळवारी दुबईला जाण्यासाठी दाखल झाला. विमानतळावरील एक्स-रे स्कॅनरमध्ये सुरक्षा तपासणीसाठी त्याने बॅगा टाकल्या. यानंतर स्कॅनरमध्ये जे दिसलं ते पाहून सीआयएसएफ अधिकारी चक्रावून गेले. त्याच्या सामानातून एकूण 14,22,500 दिरहम, सध्याच्या विनिमय दरानुसार सुमारे 3 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सदर इसम अमिरातीच्या विमानाने दुबईला जाणार होता.

गेल्या वर्षी, एका कुटुंबातील तीन सदस्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून US $ 4,97,000 (रु. 4.1 कोटी) किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबई एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) ने केलेल्या ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली. एका कुटुंबातील तीन भारतीय प्रवासी, फ्लाय दुबई फ्लाइट FZ 446 द्वारे दुबईला जात असताना त्यांना रोखण्यात आले आणि परदेशी चलनासह पकडण्यात आले.

हे सुद्धा वाचा

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....