बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट, लोकल पकडण्यासाठी ट्रॅकवर उडी घेतली तितक्याच…

मध्य रेल्वेवरील गर्दीच्या ठिकाणांपैकी बदलापूर हे एक रेल्वेस्थानक आहे. या रेल्वेस्थानकातही मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. यामुळे लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची कायम कसरत असते.

बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट, लोकल पकडण्यासाठी ट्रॅकवर उडी घेतली तितक्याच...
लोकल पकडण्यासाठी प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या घेतल्या अन्...Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 7:13 PM

बदलापूर : रेल्वे प्रवासी वेळ वाचवण्यासाठी आणि लोकल पकडण्यासाठी जीवघेणा शॉर्टकट वापरत असल्याचं चित्र आपण अनेकदा घडतो. मात्र हाच शॉर्टकट कधी कधी जीवघेणा ठरतो. यामुळे कधी कधी जीव गमवण्याची वेळ प्रवाशांवर येते. अशीच एक धक्कादायक घटना मध्य रेल्वे स्थानकावरील बदलापूर रेल्वे स्थानकावर घडली. विरुद्ध दिशेने ट्रॅकमध्ये उड्या मारून लोकल पकडण्याचा प्रयत्न प्रवासी करत होते. याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरून भरधाव वेगात एक एक्सप्रेस आली. मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणताही जीवितहानी झाली नाही. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

मध्य रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकापैकी एक बदलापूर

मध्य रेल्वेवरील गर्दीच्या ठिकाणांपैकी बदलापूर हे एक रेल्वेस्थानक आहे. या रेल्वेस्थानकातही मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. यामुळे लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची कायम कसरत असते. जर लोकलने आयत्यावेळी प्लॅटफॉर्म बदललाच तर लोकल पकडणे म्हणजे एक दिव्यच असते.

बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 3 वर लोकल येते. ही लोकल पकडण्यासाठी प्रवासी प्लॅटफॉर्म नंबर 3 ऐवजी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभे राहतात. लोकल येताच विरुद्ध दिशेने ट्रॅकमध्ये उड्या मारून ही लोकल पकडतात.

हे सुद्धा वाचा

विरुद्ध दिशेला आलेली लोकल पकडण्यासाठी प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उड्या घेतल्या

गुरुवारी सकाळी अशाच पद्धतीने काही प्रवासी लोकल पकडण्यासाठी ट्रॅकमध्ये उभे असताना अचानक प्लॅटफॉर्म नंबर 2 वर भरधाव वेगात एक एक्सप्रेस आली. त्यामुळे रुळात उभ्या असलेल्या प्रवाशांचीही चांगलीच भंबेरी उडाली. ही सगळी घटना अन्य एका प्रवाशाने मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

या घटनेनंतर दोन रुळांच्या मध्ये रेल्वे प्रशासनाने जाळ्या बसवण्याची मागणी करण्यात येत आहे. सोबतच प्रवाशांनीही काही मिनिटं वाचवण्यासाठी अशा पद्धतीने जीवघेणा शॉर्टकट वापरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.