रेल्वे स्थानकात रात्रीच्या सुमारास प्रवाशांना लुटणारी टोळी सक्रिय, घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण रेल्वे स्थानकात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी स्थानकात थांबलेल्या प्रवाशांना लुटल्याची घटना उघडकीस येत आहे.

रेल्वे स्थानकात रात्रीच्या सुमारास प्रवाशांना लुटणारी टोळी सक्रिय, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची लूटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 4:05 PM

कल्याण / सुनील जाधव : कल्याण रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर तीन प्रवाशांना मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तिघांना ताब्यात घेतलं आहे. एक जण फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. दीपक मगर, कुणाल गोंधळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. साहिल काकद नावाचा त्यांचा साथीदार पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गाडी वाट पाहत असलेल्या प्रवाशाला लुटले

कल्याण रेल्वे स्थानकाच्या नव्या पादचारी पुलावर मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुखवीर सिंह नावाचे प्रवासी झोपले होते. सुखवीर सिंह हे उत्तर प्रदेशवरून कल्याण रेल्वे स्टेशनवर आले होते. त्यांना सकाळी पुण्याला जायचे होते. गाडीची वाट पाहत पुलावर बसले असताना त्यांचा डोळा लागला. सुखवीर झोपले असल्याचे पाहून चार जण त्यांच्याजवळ आले. या चौघांनी सुखवीर सिंह यांना लाथ मारून उठवले. त्यानंतर त्यांना धमकी देत त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली.

लूट प्रकरणी तीन आरोपींना अटक

याप्रकरणी सुखवीर सिंह यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. सुखवीर यांच्या तक्रारीवरुन कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या आरोपींचा शोध सुरू केला. कल्याण जीआरपीच्या पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं. तर चौथ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

याआधीही अशा प्रकारच्या घटना प्रवाशांसोबत घडल्याचे उघडकीस आले आहे. त्या प्रकरणातील आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत. मात्र अशा प्रकारे स्टेशन परिसरात मारहाण करून प्रवाशांना लुटण्याचा प्रकार सुरू झाल्याने प्रवासी वर्गात संतापाचे वातावरण आहे. रात्री स्टेशन परिसरात पोलीस ग्रस्त का घालत नाही, असाही सवाल रेल्वे संघटनाकडून उपस्थित केला जात आहे.

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.