Kalyan : ‘पठाण’ चित्रपट संपल्यानंतर कल्याणमध्ये पती-पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण, कारण समजताचं पोलिसांना फुटला घाम

'पठाण' चित्रपट पाहिल्यानंतर पती-पत्नीला जबर मारहाण, कल्याणमधील या प्रकरणामुळे पोलिस सतर्क

Kalyan : 'पठाण' चित्रपट संपल्यानंतर कल्याणमध्ये पती-पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण, कारण समजताचं पोलिसांना फुटला घाम
कारण समजताचं पोलिसांना फुटला घाम Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 12:49 PM

कल्याण : कल्याण पश्चिम (Kalyan West) भागात पठाण चित्रपट (pathan movie) संपल्यानंतर पती-पत्नीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पती-पत्नीला लोखंडी रॉडने आणि पेव्हर ब्लॉकने मारहाण केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीसांनी (Mahatma Phule Police) सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती समजली आहे. चित्रपट सुटल्यानंतर हा प्रकार घडल्यामुळे घटनास्थळी मोठी पळापळ झाली होती. त्याचबरोबर गर्दी सुद्धा जमली होती अशी माहिती मिळाली आहे.

ही घटना कल्याण पश्चिम भागातील सर्वोदय मॉलमधील चित्रपटगृहात घडली आहे. देशभर सुपरहिट ठरलेल्या ‘पठाण’ चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा आणि शुल्लक कारणावरुन मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीला छेडल्यानंतर चिडलेल्या पतीने विचारपूस केली. त्यानंतर जाब विचारला म्हणून सहा जणांनी मिळून आगोदर पती-पत्नीला मारहाण केली. त्यानंतर चित्रपट सुटल्यानंतर पुन्हा मारहाण केली. त्यामध्ये पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. लोखंडी रॉड आणि सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने पतीच्या डोक्यात प्रहार करून गंभीर जखमी केले आहे.

हे सुद्धा वाचा

ही घटना कल्याण पश्चिम भागातील सर्वोदय मॉलमधील चित्रपटगृहाच्या दारात घडली असून या प्रकरणी महात्मा फुले पोलीसांनी सहा जणांविरोधात 326, 223, 504, 143, 147, 141, प्रमाणे गुन्हा दाखल केला असून प्रभाकर म्हात्रे, दुर्वेश म्हात्रे, प्रसाद म्हात्रे अशी या आरोपीची नावे असून तीन महिलांवर ही पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.