पोटात दुखत होतं, डॉक्टरांनी रात्रीतून ऑपरेशन केलं, मुलगी शुद्धीवरच आली नाही… औरंगाबादेत नातेवाईकांचा….

रात्री-अपरात्री दोन्ही हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अचानक हात वर केल्याने भांबावलेल्या नातेवाईकांचा संताप झाला.

पोटात दुखत होतं, डॉक्टरांनी रात्रीतून ऑपरेशन केलं, मुलगी शुद्धीवरच आली नाही... औरंगाबादेत नातेवाईकांचा....
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 11:37 AM

दत्ता कनवटे, औरंगाबादः औरंगाबादेत रुग्णांच्या (Aurangabad Hospital) नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करण्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्रीतून हा प्रकार घडला. एका 20 वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तडकाफडकी ऑपरेशन (Operation) करण्याचा सल्ला दिला. गंभीर स्थिती पाहता, नातेवाईकांनी (Relatives of Patients) ऑपरेशनचा निर्णयदेखील घेतला. मात्र ऑपरेशननंतर बराच वेळ मुलगी शुद्धीवरच येत नव्हती. त्यामुळे घाबरलेल्या आणि संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.

ही घटना घडलीय इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये. शुक्रवारी दुपारीच सिटी चौक परिसरात राहणाऱ्या मुलीच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नातेवाईकांनी सांगितल्या प्रमाणे- दुपार पर्यंत ते मुलीशी बोलत होते.

तिच्या पोटात इन्फेक्शन झाल्याचं डॉक्टरांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला. तिच्यावर ऑपरेशनदेखील झालं. मात्र रात्री अकरा वाजेपर्यंत ती शुद्धीवरच आली नाही.

अखेर इंटरनॅशनल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मुलीला सिटी स्कॅनसाठी एमजीएम रुग्णालयात नेण्यास सांगितलं. अँब्युलन्समध्ये तिला एमजीएम रुग्णालयात नेण्यात आलं.

Aur Hospital

मात्र तेथील डॉक्टरही ऐनवेळी निघून गेले, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. मुलगी बेशुद्ध अवस्थेत अँब्युलन्समध्येच होती. पुन्हा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये तिला परत आणलं तर तेथील डॉक्टर गायब झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.

रात्री-अपरात्री दोन्ही हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अचानक हात वर केल्याने भांबावलेल्या नातेवाईकांचा संताप झाला. त्यांनी रुग्णालयावर दगडफेक सुरु केली. यात इंटरनॅशनल हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली. रुग्णालयाच्या काही काचा फुटल्या आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.