पाटण्यात आग, 5 जणांवर गोळीबार; TV9 च्या रिपोर्टरवर हल्ला
गुन्हेगारांनी टीव्ही ९ च्या रिपोर्टरचा मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस तिथं होते. पण, त्यांनी चुपचाप तमाशा पाहिला. रिपोर्टरच्या सुरक्षेसाठी कुणीही समोर आले नाही.
पाटणा : बिहारची (Bihar) राजधानी पाटणा (Patna) येथे गुन्हेगारांचे इरादे पक्के झालेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला दिसत नाही. रविवारी पार्किग वादानंतर पाटण्यात आग लागली. हिंसक घटना घडल्या. गोळीबारीत दोन जणांचा मृत्यू झाला. रिपोर्टिंग करणाऱ्या TV9 चे रिपोर्टर रुपेश कुमार यांच्यावर हल्ला झाला. गुन्हेगारांनी टीव्ही ९ चा कॅमेरा हिसकावला. शिवाय टीव्ही ९ च्या टीमसोबत गैरव्यवहार केला. गुन्हेगारांनी टीव्ही ९ च्या रिपोर्टरचा मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस तिथं होते. पण, त्यांनी चुपचाप तमाशा पाहिला. रिपोर्टरच्या सुरक्षेसाठी कुणीही समोर आले नाही. संतप्त लोकांनी कम्युनिटी हॉलसह काही इमारतींना आग लावली. कम्युनिटी हॉलच्या मागे गॅसचा गोडाऊन आहे.
गाडी पार्किंगवरून वाद
आगीत कम्युनिटी हॉल जळला. स्थानिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. ही घटना नदीठाणा क्षेत्रातील जेठुली घाट येथील आहे. माजी पंचायत सदस्य टुनटुन यादव गॅरेजमधून गाडी काढत होते. जेठुलीतील सरपंचाचे पती सतीशच्या चालकाने टुनटुन यादवला गाडी हटवण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.
पाच जणांवर गोळीबार
या घटनेवरून बच्चा राय याने गोळीबार केल्याचे सांगितले जाते. या गोळीबारात पाच जणांना गोळ्या लागल्या. चंद्रिका राय, मुनारींक राय, रोशन कुमार, गौतम कुमार आणि नारेंद्र राय यांना बंदुकीच्या गोळ्या लागल्या. यात पाचही जण जखमी झाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.
ताबडतोब गोळीबार
दोन्ही बाजूने गोळीबार झाल्याचं सांगितलं जातं. या गोळीबारात गौतम कुमार यांचा मृत्यू झाला. कुमार यांचे कुटुंबीय म्हणाले, कुमार पार्किंगमधून गाडी काढत होते. रस्त्यात गिट्टी उतरवली जात होती. त्यावरून वाद झाला होता. शुल्लक कारणावरून गुंडांनी गोळीबार केला.
पाटण्यात गुन्हेगारी वाढली
पाटणा येथी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. फुलवारीशरीफ ठाण्याअंतर्गत गुन्हागारांनी हॉटेल चालकावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. आरोपी छतावरून उड्या मारून निघून गेला. शास्त्रीनगर ठाण्याअंतर्गत वसतिगृह चालवणाऱ्या महिलेची चैन लुटण्यात आली होती. अशा गुन्हेगारी प्रवृतीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.