इन्स्टाग्रामवर मैत्री, मग प्रेमाच्या आणाभाका, प्रेयसीला भेटायला गेला तो परतलाच नाही !

इन्स्टाग्रामवर प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. मग भेटायचं ठरलं. रात्रीपर्यंत घरी येतो सांगून तरुण इन्स्टावरील प्रेयसीला भेटायला निघून गेला. मात्र त्यानंतर परतलाच नाही.

इन्स्टाग्रामवर मैत्री, मग प्रेमाच्या आणाभाका, प्रेयसीला भेटायला गेला तो परतलाच नाही !
इन्स्टाग्रामवरील प्रेयसीला भेटायला गेला तो परतलाच नाहीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 2:35 PM

पटना : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोशल मीडियाचं वेड लागलं आहे. सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह रहायचं हा रोजच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. सोशल मीडियावर नाती जोडली जातात आणि फसवणुकाही होतात. अशीच एक धक्कादायक घटना पटनात उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर गयाच्या तरुणाची पटनामधील तरुणीशी ओळख झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली, मग प्रेमसंबंध जुळले. मग दररोज दोघांमध्ये चॅटिंग सुरु होते. शुक्रवारी दोघांनी भेटण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तरुण गयाहून पटनाला तरुणीला भेटायला आला. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सायंकाळी त्याच्या घरच्यांना थेट 50 लाखाच्या खंडणीची मागणी करण्यासाठी फोन आला. त्यानंतर सदर फोनही बंद झाला.

इन्स्टाग्रामवर ओळख, मग प्रेम

गया येथील ऋषभ चौधरी या 15 वर्षीय तरुणाची पटना येथील मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. मग दोघांचे प्रेमसंबंध जुळले. काही दिवस इन्स्टावर चॅटिंग केल्यानंतर दोघांनी भेटायचे ठरवले. त्यानुसार शुक्रवारी तरुण संध्याकाळपर्यंत परत येतो सांगून गयाहून मुलीला भेटण्यासाठी पटनाला गेला. त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते. पटनाजवळील संपतचकजवळ पोहचताच त्याचा मोबाईल बंद झाला.

प्रेयसीला भेटायला गेला तो परतलाच नाही

तरुणाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ संपतचकमध्ये इन्स्टाग्रामवरील प्रेयसीला भेटला. मग दोघे बाईकवरुन कुठेतरी निघून गेले. त्यानंतर तरुणाशी काहीही संपर्क होऊ शकला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ऋषभच्या घरच्यांना एक फोन आला आणि फोनवर 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र घरच्यांनी पैसे कुठे द्यायचे विचारताच फोन बंद झाला. त्यानंतर तो फोन सतत बंद येत होता.

हे सुद्धा वाचा

यानंतर ऋषभच्या घरच्यांनी बेलागंज पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून, मोबाईलचे लोकेशन ट्रेस करत आहेत. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. तपासाअंती सर्व सत्य उघड होईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.