बसमध्ये मुलीची छेड काढली.. मग काय, प्रवाशांनी धू-धू धुतलं, अन् पोलिसांच्या ताब्यात दिलं
सरकारी बसमधून जाताना एका मुलीची छेड तरूणाने छेड काढली असता प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला.
Crime News : सरकारी बसमध्ये एक तरूणीची छेड काढणाऱ्या बदमाशाला इतर प्रवाशांनी बेदम चोप देत चांगलीच अद्दल घडवली. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात ही घटना घडली. मुलीला त्रास देणाऱ्या त्या बदमाशाला चोपल्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
हे प्रकरण वाल्टरगंज पोलीस ठाण्याच्या मनौरी चौकातील आहे. तांजी सिंग उर्फ मुन्ना असे आरोपीचे नाव आहे. तांजी सिंग हा सरकारी बसमध्ये मुलींची छेड काढत होता आणि अश्लील कृत्य करत होता. मुलीने विरोध केल्यावर बस प्रवाशांना तांजी सिंगचे कृत्य कळले. त्यानंतर प्रवाशांनी तांजी सिंगला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तांजीला अटक करून तुरुंगात पाठवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बदमाश व्यवसायाने कंत्राटदार आहे. तो सरकारी बसने गोरखपूरहून सिद्धार्थनगरला जात होता. गोरखपूरहून एक मुलगी तिच्या कुटुंबासह बसमध्ये चढली. तांजी सिंगने बसमध्ये तरुणीसोबत फ्लर्ट करण्यास सुरुवात केली. मुलीला त्याचा व्यक्तीचा राग आल्यावर तिने नातेवाईकांना त्याच्या या कृत्याबद्दल सांगितले. ते कळल्यावर तिचे नातलग आणि बसमधील लोकांनी प्रथम त्याला बसमध्येच बेदम मारहाण केली. त्याला पकडून बसवण्यात आले. बस मनौरी चौकात आल्यावर पोलिस चौकीत बस थांबवण्यात आली. नंतर प्रवाशांनी छेड काढणाऱ्या बदमाशाला बसमधून उतरवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
वॉल्टरगंज पोलिस स्टेशनचे एसओ नारायण लाल श्रीवास्तव यांनी सांगितले की, तांजी सिंगला मुलीच्या नातेवाईकांनी आणि बसच्या कंडक्टरने पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून तांजी सिंगविरुद्ध कलम ३५४, ३५४अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.