पॉर्न व्हिडीओ प्रकरणात आणखी एकाला अटक, मोठे खुलासे होण्याची शक्यता
पॉर्न शूटिंग आणि अपलोडिंग प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेली 36 वर्षीय व्यक्ती एक व्यावसायिक छायाचित्रकार असून शान धनाजी असे त्याचे नाव आहे. (Shan Dhanaji porn film shooting uploading)
मुंबई : पॉर्न शूटिंग आणि अपलोडिंग प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेली 36 वर्षीय व्यक्ती एक व्यावसायिक छायाचित्रकार असून शान धनाजी असे त्याचे नाव आहे. सोमवारी ( 8 फेब्रुवारी) या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने ही कारवाई केली. (photographer Shan Dhanaji arrested in porn film shooting and uploading case)
टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठाला मुंबई क्राईम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) प्रॉपर्टी सेलने अटक केल्यानंतर पोलिसांना अनेक नवे धागेदोरे सापडत आहेत. पोलिसांच्या तपासात समोर येत असलेल्या माहितीवरुन पॉर्न शुटिंग प्रकरणात अनेक जण अडकण्याची शक्यता आहे. याच तपासाच्या माध्यमातून क्राईम ब्रँचने शान धनाजी नावाच्या 36 वर्षीय व्यावसायिक छायाचित्रकाराला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शान हा आधीपासून अटकेत असलेली निर्माती, दिग्दर्शक आणि अभिनेत्री यास्मीन खान उर्फ रोआ खानचा पती आहे. प्रॉपर्टी सेलने मढ़-मालवणीतील ग्रीन पार्क बंगल्यात धाड़ टाकून एकूण 5 जणांना अटक केली होती. या 5 जणांमध्ये रोआ खान यासुद्धा होत्या. सोमवारी त्याच्याच पतीला म्हणजेच शान धनाजी यांना अटक करण्यात आलीय.
दरम्यान, निर्माती, दिग्दर्शक आणि अभिनेत्री रोआ खानसोबत इतर चार जणांना अटक केल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि मिडल मॅन उमेश कामत यांना अटक करण्यात आली. पोलिसांकडून रोआ खान आणि इतर चार जणांची चौकशी सुरु आहे. पॉर्न शुटिंग आणि अपलोडींग प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शान धनाजी जाधव यांच्या अटकेनंतर या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
उमेश कामत यालाही अटक
अभिनेत्री गहना वशिष्ठ हिच्यासोबत पॉर्न शुटिंग आणि अपलोडिंग प्रकरणात मिडल मॅन म्हणून काम करत असलेला उमेश कामत यालाही अटक करण्यात आली. मूळचा गोव्याचा असलेला यापूर्वी उमेश हा देशातील खुप मोठ्या उद्योगपतीचा PA होता. पण काही कारणास्तव त्याची ती नोकरी गेली आणि उमेश या पॉर्नच्या धंद्यात शिरला. परदेशी अॅपला पॉर्न फिल्म विकून उमेश आणि गहना कोट्यवधी रुपये कमवत होता. HotMovies नावाची वेबसाईट तयार करुन त्या वेबासाईटवर या पॉर्न फिल्म विकल्या जात होत्या. तर उमेश त्याचे परदेशातील सोर्स वापरुन याच पॉर्न फिल्म जगभर विकत होता. अटक केल्यानंतर उमेशला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
इतर बातम्या :
पॉर्न फिल्म प्रकरणात अभिनेत्रीच्या अटकेनंतर नवा खुलासा; बड्या उद्योजकाच्या माजी पीएला अटक
पॉर्न फिल्मच्या वादामुळे सोशल मीडियावर गहना वशिष्ठची जोरदार चर्चा; नेटकरी म्हणतात…
(photographer Shan Dhanaji arrested in porn film shooting and uploading case)