Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनीमूनहून येत होते, अचानक डॉक्टरांना बोलावलं, सांगणही अवघड जातंय; काय घडलं?

बाल्टीमोरमध्ये हनीमूनला गेलेल्या एका जोडप्यातील महिलेला फ्लाइटमध्ये हृदयविकाराचा झटका आला. सोबत प्रवास करणाऱ्या एका आरोग्य सेविकाने वेळीच प्रथमोपचार केले आणि तिचा जीव वाचवला. ऑक्सिजन, पातळ अन्न आणि डिफिब्रिलेटरचा वापर करून तिने महिलेला स्थिर केले.

हनीमूनहून येत होते, अचानक डॉक्टरांना बोलावलं, सांगणही अवघड जातंय; काय घडलं?
Couple NewsImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Mar 24, 2025 | 3:42 PM

Honeymoon News : लोक नेहमीच आपला हनीमून अविस्मरणीय होण्यासाठी आऊटडोरला जातात. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण मॅरिलँडच्या बाल्टीमोरमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. हवाईवरून येणाऱ्या एका फ्लाईटमध्ये एका डॉक्टराच्या मदतीमुळे एका महिला प्रवाशाचा जीव वाचला. हनीमूनहून येत असताना तिचा जीव वाचवण्यात आला. डॉ. जॅक्वेलिन लॅसेरा या हवाईवरून हनीमूनहून येत होत्या. येताना अचानाक त्यांची फ्लाईटमध्ये तब्येत बिघडली. तिची प्रकृती नाजूक झाली होती. मला मळमळ होत होती. त्यामुळे मी लगेचच बाथरूमकडे पळाले. त्यानंतर मी घामाघून झाले. माझ्या छातीत कळा येत होत्या, असं लॅसेरा म्हणाल्या.

मॅरिलँडच्या मेड स्टार फ्रँकलिन स्क्वायर मेडिकल सेंटरमध्ये आपत्कालीन कक्षातील आरोग्य साहयक असलेली एमिली हेली ही सुद्धा त्याच फ्लाईटमधून प्रवास करत होती. आम्ही झोपण्याची तयारी करत होतो. तेव्हा अचानक वैद्यकीत मदतीचा कॉल आला. त्यासरशी मी उठले आणि लॅसेराच्या संकेताची चौकशी केली. त्यावेळी ती एरिथमियाची शिकार असल्याचं जाणवलं, असं एमिली म्हणाली.

विमानातच ऑक्सिजन लावलं

तब्येत नाजूक झाल्यावर एमिलीने लॅसेराला पातळ पदार्थ खायला दिले आणि ऑक्सिजन लावलं. पण परिस्थितीत काही बदल झाला नाही. त्यानंतर तिने डिफिब्रिलेटरचा वापर केला. मी लॅसेराला म्हटलं की मला तुला शॉक द्यावा लागेल. त्यावर तिने सहमती दर्शवली. हा शॉक वेदनादायी होता. पण त्याने लॅसेराचा जीव वाचला, असं एमिलीने सांगितलं.

पत्र पाठवून आभार

फ्लाइट कॅलिफोर्नियाला लँड होईपर्यंत लॅसेराची तब्येत स्थिर होती. एअरलाईननेही मदत केल्याबद्दल एमिलीचे पत्र पाठवून आभार मानले आहेत. दोन्ही महिला संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. लॅसेराने तिच्या काँग्रेस सदस्यांना विमानात आरोग्याची उचित सुविधा नसल्याची तक्रार केली आहे.

हनीमूनसाठी गेले होते

लॅसेरा आणि तिचा नवरा हे हनीमूनसाठी गेले होते. लॅसेरा ही 61 वर्षाची आहे. तिच्या आयुष्यातील हा खास क्षण होता. पण विमानातून परतत असताना अचानक तिची तब्येत ढासळली आणि सर्वांनाच घाम फुटला. लॅसेराला अशा अवस्थेत पाहून तिचा नवराही घामाघूम झाला होता. फ्लाईटमधील सर्व प्रवाशी काळजी करत होते. पण एमिलीने वेळीच प्रसंगावधान दाखवत सर्व परिस्थिती अत्यंत चाणाक्षपणे हाताळली आणि पुढील अनर्थ टळला.

'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.