Pune crime : पोलीस भरती घोटाळ्याचा पर्दाफाश, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई; मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त

आजवर बीड, औरंगाबाद, जालना, नागपूर, अमरावती, अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी 20हून अधिक वेळा वेगवेगळ्या तपास पथकांनी आरोपी राहत असणाऱ्या दुर्गम परिसरात जाऊन आरोपींना अटक केली आहे.

Pune crime : पोलीस भरती घोटाळ्याचा पर्दाफाश, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई; मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 11:34 AM

पिंपरी : पोलीस भरती घोटाळ्यातील (Police Recruitment Exam Scam) तब्बल सहा रॅकेटचा पिंपरी-चिंचवडमध्ये पर्दाफाश करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad police) गुन्हे शाखा युनिट चारने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकूण 56 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील 5 जणांना 22 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना आणि बीड येथून अटक केली होती. त्यांच्याकडून 100हून जास्त ब्लू टूथ इयर बड्स मोबाइल्स, वॉकीटॉकी, स्पाय डिव्हाइसेस, चार्जर आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आला. त्यानंतर याप्रकरणी निगडी पोलीस (Nigdi police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलीस आपली कार्यवाही करत होते. त्यात विविध ठिकाणांहून आरोपींना ताब्यात घेऊन आता कारवाई करण्यात येत आहे.

56 जणांना अटक

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात 720 जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती नोव्हेंबर 2021मध्ये झाली होती. जानेवारी 2022 पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू होती. या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट चार या गुन्ह्याचा तपास करत होते. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात 56 जणांना अटक केली आहे. यातील 26 जण हे भरतीमध्ये उमेदवार होते. शिवाय आणखी 75पेक्षा अधिक जण या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या 75 आरोपींमधील 12 आरोपी भरती प्रक्रियेत घोटाळा करूनदेखील नापास झाल्याचे निदर्शनास आले आहे.

मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद, जालना आणि बीडयेथून ज्ञानेश्वर सुखलाल चंदेल (वय 29 रा. जालना), कार्तिक उर्फ वाल्मिकी सदाशिव जारवाल (वय 23 रा. औरंगाबाद), अरूण विक्रम पवार (वय 26 रा. बीड), अर्जुन विष्णू देवकाते (वय 28 रा. बीड), अमोल संभाजी पारेकर (वय 22 रा. बीड) यांना 22 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. त्यांच्याकडून 76 मोबाइल्स, 66 इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाइस, 22 वॉकीटॉकी, 11 वॉकीटॉकी चार्जर, 11 लाख रुपये रोख असे भले मोठे साहित्य जप्त केले आहे. याशिवाय डिव्हाइस लपवून परीक्षेला नेण्यासाठी वापरलेले कापडे, सिमकार्ड्स, कागदपत्रे हेदेखील जप्त केली आहेत.

हे सुद्धा वाचा

दुर्गम परिसरातून आरोपींवर कारवाई

औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यात परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या सहा टोळ्यांचा या कारवाईत पर्दाफाश करण्यात आला आहे. आजवर बीड, औरंगाबाद, जालना, नागपूर, अमरावती, अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी 20हून अधिक वेळा वेगवेगळ्या तपास पथकांनी आरोपी राहत असणाऱ्या दुर्गम परिसरात जाऊन आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चार, सायबर सेल, तांत्रिक विश्लेषण विभाग, विशेष पथकाचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी संयुक्तपणे केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.