Nashik Crime : गाडीचा कट लागला म्हणून धमकावले, रोकड आणि सोनं लुटून…

राज्यात गुन्ह्याच्या घटना वाढल्या आहेत. लूटमार करण्यासाठी आरोपींनी नवी शक्कल लढवण्यास सुरूवात केली आहे. खोटं भांडण करून लोकांना लुटण्याचा नवा मार्ग त्यांनी शोधला आहे.

Nashik Crime : गाडीचा कट लागला म्हणून धमकावले, रोकड आणि सोनं लुटून...
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 1:06 PM

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : राज्यभरात गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्येदेखील गुन्हेगारीचं (crime in nashik) प्रमाण वाढलं आहेत. तेथे लोकांना लुटण्यासाठी चोरट्यांनी नवनवी शक्कल लढवण्यास सुरूवात केली आहे. तेथे दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी एका कारचालकाशी भांडण करत त्याला लुटल्याचे (robbery)  समोर आले आहे. विशाल चाफळकर, अनिकेत गवळी असे या दोन संशयितांचे नाव आहे.

गाडीचा कट लागला या कारणावरून केले भांडण

विशाल आणि अनिकेत या दोघांनी एका कारचालकाला धमकावत त्याला लुटल्याची माहिती मिळाली आहे. साहिल ठाकूर असे फिर्यादीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचा कट लागला या कारणावरून विशाल आणि अनिकेत यांनी साहिल ठाकूर याच्याशी भांडण सुरू केले. हा वाद वाढतच गेला आणि त्या दोघांनी साहिलकडून रोख रक्कम आणि त्याची सोन्याची चेन बळजबरीने काढून घेतली. एवढेच नव्हे तर आणखी पैसे दे नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकीही आरोपींनी त्याला दिली.

साहिला याने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी जिथे गुन्हा घडला त्या आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले. त्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला आणि त्या दोघांनाही अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे समजते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.