Crime News : पाच जिल्ह्यातून मोटारसायकल चोरणाऱ्याला पोलिसांनी केली अटक, लाखो रुपयांच्या गाड्या घेतल्या ताब्यात
सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचा तपास सुरू असताना विश्रामबाग परिसरातील 100 फुटी रोडवरील धामणी चौक या ठिकाणी चोरीतील मोटरसायकल विक्री करण्यासाठी एक तरुण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली
सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी (Motorcycle theft) करून विकणाऱ्या एका अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ दुचाकीसह दोन लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करण चव्हाण वय (26) असे या संशियताचे नाव आहे. त्याच्याकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता सांगली पोलिसांनी (Crime News) व्यक्त केली आहे.
सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचा तपास सुरू असताना विश्रामबाग परिसरातील 100 फुटी रोडवरील धामणी चौक या ठिकाणी चोरीतील मोटरसायकल विक्री करण्यासाठी एक तरुण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या करण चव्हाण राहणाऱ नागज तालुका कवठेमहांकाळ याला ताब्यात घेऊन तिच्याकडे सदरच्या गाडीची चौकशी केली.
सुरुवातीला त्याने उडवा उडवी ची उत्तरे दिली आणि याबाबतची कागदपत्रे नसल्याचे सांगितल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने ती दुचाकी चोरल्याची असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. त्याने ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
त्यानंतर त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करत करण्यात आल्या आहेत. सहा गुन्हे उघडकीस आणत दोन लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.